ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर, भारतात एक दिवसाचा शोक पाळण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

इतिहासात ब्रिटनच्या सिंहासनावर प्रदीर्घ काळ विराजमान असलेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II ) यांचे काल (गुरुवार) वृद्धापकाळाने निधन झाले.

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर, भारतात एक दिवसाचा शोक पाळण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

इतिहासात ब्रिटनच्या सिंहासनावर प्रदीर्घ काळ विराजमान असलेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II ) यांचे काल (गुरुवार) वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९६ व्या वर्षी स्कॉटलंडमधील बाल्मोरल येथील प्रासादात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर, या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्याच निर्णय घेतला आहे.

राणी एलिझाबेथ द्वितीयच्या डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं, मात्र त्यांना वाचवता आले नाही. एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे. तसेच भारतानंही दु:ख व्यक्त केले आहे. भारतानं एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतात एक दिवसाचा दुखवटा पाळण्याचे आदेश दिलेत. भारताच्या गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे. ११ सप्टेंबरला संपूर्ण भारतात एक दिवसाचा शोक पाळला जाणार असल्याचं आदेशात नमूद करण्यात आले आहे.

एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र चार्ल्स ब्रिटनच्या सिंहासनावर बसतील. ते गुरूवारची रात्र स्कॉटलंडमध्येच राहणार असून शुक्रवारी लंडनला परतणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार असलेल्या, ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके विराजमान असणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं काल वृद्धपकाळानं निधन झालं. त्या ९६ वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला ब्रिटीश राजघराण्याकडून आणि ब्रिटन सरकारकडून त्याचबरोबर जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला जात आहे. महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीच्या नियोजनासाठी ‘ऑपरेशन युनिकॉर्न’ सुरू करण्यात आले आहे.

एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये २१ एप्रिल १९२६ रोजी झाला. एलिझाबेथ यांचे वडील जॉर्ज यांचे १९५२ मध्ये निधन झाले. त्यानंतर एलिझाबेथ यांना १९५२ मध्ये ब्रिटनची महाराणी म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सलग सात दशके ब्रिटनची महाराणी म्हणून कामकाज पाहिले. एलिझाबेथ या जगात सर्वाधिक काळ सत्ता हाकणाऱ्या महाराणी आहेत. एलिझाबेथ यांच्या मृत्यनंतर तब्बल १० दिवसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हे ही वाचा:

राज ठाकरेंची ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना दिली आदरांजली! सोशल मीडियावर पोस्ट होतेय व्हायरल

एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी ‘ऑपरेशन युनिकॉर्न’चे नियोजन

राणी एलिझाबेथ II यांचे निधन झाले आहे, बकिंगहॅम पॅलेसने घोषणा केली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version