spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सीमा हैदर प्रकरणानंतर आता अंजु प्रकरण…

सध्या सोशल मीडियावरून प्रेमप्रकरण वाढत आहे. आणि सध्या हिंदू मुस्लिम लग्न सोहळे सुद्धा होत आहे. मध्यंतरीच्या काळात सीमा हैदर प्रकरण वेग धरून होता. गेम खेळण्यातून त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्याचे रूपांतर लग्नात झाले

सध्या सोशल मीडियावरून प्रेमप्रकरण वाढत आहे. आणि सध्या हिंदू मुस्लिम लग्न सोहळे सुद्धा होत आहे. मध्यंतरीच्या काळात सीमा हैदर प्रकरण वेग धरून होता. गेम खेळण्यातून त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्याचे रूपांतर लग्नात झाले आणि पाकिस्तान मधून आलेली सीमा हि सध्या भारतमध्ये राहत आहे, आणि तिची चौकशी देखील चालू आहे आता तशीच घटना पाकिस्तान मधून समोर येत आहे. मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर मैत्री केल्यानंतर भारतातून अंजू तिचा मित्र नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली. अंजू कायदेशीर रित्या व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेली होती, पण आता तिने तिथे धर्म बदलला आणि नसरुल्लाह या मित्राशी निकाह केला आहे. अंजूने तिचं नाव बदलून फातिमा ठेवलं. मुलीच्या या कृत्याने अंजूच्या वडिलांना दु:ख झालं आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या प्रकरण तिच्या वडिलांना विचारले असता ते म्हणाले, मध्य प्रदेशातील टेकनपूर येथे राहणारे अंजूचे वडील म्हणाले, “ती आमच्यासाठी आता मेली आहे. मला कोणत्याही गोष्टीची माहिती नाही. आता तिच्याशी माझं काही देणं-घेणं नाही, ती तिला हवं ते करू शकते.” मुलीच्या पाकिस्तानात जाण्याच्या प्रश्नावर वडील म्हणाले की, तिचं काय चाललं होतं हे मला माहीत नाही कारण मी गेलं एक वर्ष तिच्याशी बोललो देखील नाही. जी मुलगी आपल्या मुलांना सोडून गेली, तिच्याशी आमचं नातं संपलं आहे. नवऱ्याला सोडा, जी स्वत:च्या मुलांना सोडून गेली त्या मुलीशी माझा संबंध कसा असू शकतो? असं म्हटलं आहे. दुसरीकडे, व्हिसाची मुदत संपल्यानंतर देशात परतण्याच्या प्रश्नावर अंजूच्या वडिलांनी सांगितले की, व्हिसाची मुदत संपली काय किंवा ती स्वतःच संपली काय आता याच्याशी माझा काहीही संबंध नाही.

मात्र आता असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे ते म्हणजे, अंजूने तिच्या दोन मुलांचंही आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. आता १४ वर्षांच्या मुलाची आणि ५ वर्षांच्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न समोर येऊन ठेपला आहे. कारण पाकिस्तान मीडियाच्या रिपोर्टनुसार अंजूने तिचा धर्म बदलला आहे, त्यानंतर अंजूचे इस्लामिक नाव फातिमा ठेवण्यात आले आहे. प्रियकरासाठी अंजू भारतातून पाकिस्तानात गेली आणि त्यानंतर आता तिने निकाह केला आहे, सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा:

इगतपुरीमधील महिलेचा मुद्दा अधिवेशनात चर्चेत, फडणवीस-पटोले यांच्यामध्ये खडाजंगी

इगतपुरी तालुक्यात संतापजनक घटना समोर, शासन आपल्या दारी सरकारी योजना ठरतेय फेल…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss