Air India – एअर इंडियाच्या विमानात आणखीन एक घाणेरडा प्रकार, प्रवाशाने सर्वांसमोर केलं…

एअर इंडिया ही भारत देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो (Indigo) आणि जेट एअरवेज (Jet Airways) खालोखाल एअर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते.

Air India – एअर इंडियाच्या विमानात आणखीन एक घाणेरडा प्रकार, प्रवाशाने सर्वांसमोर केलं…

एअर इंडिया ही भारत देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो (Indigo) आणि जेट एअरवेज (Jet Airways) खालोखाल एअर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. जगातील आघाडीच्या आणि बहुचर्चित एअर इंडियाच्या (Air India) प्रवाशांचे अनेक घाणेरडे प्रकार समोर येत आहेत. यावर कंपनीने कठोर कारवाई करणार असल्याचे आदेश दिले होते असे असतानाही हे प्रकार काही कमी होताना दिसत नाहीये. असाच एक विचित्र घाणेरडा प्रकार एअर इंडियाच्या (Air India) मुंबई-दिल्ली विमानात करण्यात आला आहे.

२४ जून रोजी एआयसी ८६६ या फ्लाइटमध्ये ही घटना घडली असून राम सिंग नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे. राम सिंग 17F वर बसले असता त्याचे प्रथम गैरवर्तन पाहून त्याला बाकीच्यांशी वेगळे करत केबिन क्रूकडून (cabin crew) त्याला सक्त ताकीत देण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करत या प्रवाशाने सीटवरच लघवी करून थुंकण्याचा सुद्धा प्रकार केला. विमानाची लँडिंग होईपर्यंत इतर प्रवाशांची या प्रकरणामुळे मधल्यामध्ये कोंडी झाली होती. अखेर लँडिंग झाल्यावर, आरोपी प्रवाशाला स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यासाठी एअर इंडियाचे सुरक्षा प्रमुख (Head of Security of Air India) उपस्थित होते. भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ (अश्लील कृत्ये) आणि ५१० (मद्यधुंद व्यक्तीकडून सार्वजनिक गैरवर्तन) या दोन कलमांअंतर्गत सदर व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एअर इंडियानेही (Air India) या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केले असून, “हा प्रकार अस्वीकार्य आहे” असे स्पष्ट केले आहे.

राम सिंग हा आरोपी प्रवासी आफ्रिकेत स्वयंपाकी (cook) म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याला या प्रकरणी दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आले होते नंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले ज्यात त्याला जामीन मिळाला आहे. विमानातील इतर प्रवाशांनी या प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे.

 

हे ही वाचा:

मॅनहोलमध्ये पडल्यामुळे दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक

अल-हकीम मशिदीला भेट देण्यापासून ते अल-सिसीला भेटण्यापर्यंत, जाणून घ्या पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version