Airbus Beluga : मुंबईच्या विमानतळावर जगातील सर्वात मोठ्या विमानांची झाली ग्रँड एन्ट्री

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) जगातील सर्वात मोठे विमान उतरले.

Airbus Beluga : मुंबईच्या विमानतळावर जगातील सर्वात मोठ्या विमानांची झाली ग्रँड एन्ट्री

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) जगातील सर्वात मोठे विमान उतरले. ‘एअरबस बेलुगा’ (Airbus Beluga) असं या नागरी उपयोगासाठी असणाऱ्या विमानाचं नाव आहे. या विमानाबरोबरच प्रवासी वाहतुकीत जगात सर्वाधिक अत्याधुनिक असलेले ‘एम्ब्रेअर ई १९२ -ई2’ (Embraer E192-E2) प्रॉफिट हंटर हे विमानदेखील मंगळवारी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे. या दोन्ही मोठ्या विमानांची मुंबई विमानतळावर पहिली ग्रँड एन्ट्री झाली.

बेलुगा एअरबसचा वेग प्रचंड आहे. या विमानाचा कमाल वेग ८६४ किलोमीटर प्रति तास आहे. ते एकावेळी जास्तीत जास्त २७ हजार ७७९ किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते. कमाल ३५ हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते. एअरबस बेलुगा या विमानाला अधिकृतपणे Airbus A300-608ST (सुपर ट्रान्सपोर्टर) असे म्हणतात. याला बेलुगा म्हणतात कारण त्याची रचना बेलुगा व्हेल माश्यासारखी आहे. या बेलुगा एअरबस सुपर ट्रान्सपोर्टर विमान जगातील सर्वात मोठे विमान आहे. बेलुगा एअरबसचे पहिले उड्डाण १३ सप्टेंबर १९९४ रोजी झाले होते. एअरबसने १९९२ ते १९९९ दरम्यान अशी केवळ पाच विमाने बनवली आहेत. एवढे मोठे विमान फक्त दोन पायलट उडवतात. हे विमानामध्ये ४० हजार ७०० किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. हे विमान १८४.३ फूट लांब आणि ५६.७ फूट उंच आहे. जेव्हा ते पूर्णपणे रिकामे असते तेव्हा त्याचे वजन ८६,५०० किलो असते.

दरम्यान, एअरबस कंपनीचे ‘ए३०० – ६०० एसटी’ हे ‘बेलुगा’ नावे ओळखले जाणारे विमान ५१ टन मालवाहू क्षमतेसह जगातील सर्वात मोठे विमान आहे. वैमानिक खाली व विमानाचा मुख्य भाग त्याच्या वर आहे. खालील भागापेक्षा दुप्पटीने वरचा भाग मोठा आहे. अत्यंत वेगळ्या आकारातील हे विमान आहे. नागरी उपयोगातील अँन्तोनोव्ह कंपनीचे ‘एएन १२४ ‘ व ‘एएन २२५’, ही दोन विमाने सर्वाधिक मोठी होती. या दोघांची सामान वाहून नेण्याची क्षमता ही १७१ व २५० टन आहे. या तोडीचे अन्य कुठलेही विमान आतापर्यंत अस्तित्वात नव्हते. ‘एएन २२५’ विमानाने दिल्ली मेट्रोसाठीचे डबे आणले गेले होते.

हे ही वाचा : 

Aditya Thackeray: आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version