Saturday, July 6, 2024

Latest Posts

Alka yagnik यांना झालेला Sensorineural Hearing Loss हा आजार नक्की काय आहे? काय आहेत लक्षणे?

त्याचबरोबर अलका अनेक स्टेज शो करत असतात. अचानक झालेल्या आजाराबद्दल अलका याग्निक यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “काही आठवड्यांपूर्वी मी फ्लाइटमधून प्रवास करत असताना फ्लाइटमधून बाहेर पडत होते आणि अचानक मला काही ऐकू येईनासे झाले. हा एक मेंदूचा दुर्मिळ आजार आहे.

अलका याग्निक (Alka Yagnik) या ९० दशकातील सर्वोत्कृष्ट गायकांपैंकी एक गायिका आहेत. अनेक वर्षांपासून त्या गाण्यांद्वारे लोकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांनी गायलेल्या गाण्यांपैकी ‘तू शायर है, में तेरी शायरी’, ‘गली में आज चाँद निकला’, ‘अगर तुम साथ हो’ अशा अनेक सुपरहिट गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्याचबरोबर अलका अनेक स्टेज शो करत असतात. अचानक झालेल्या आजाराबद्दल अलका याग्निक यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “काही आठवड्यांपूर्वी मी फ्लाइटमधून प्रवास करत असताना फ्लाइटमधून बाहेर पडत होते आणि अचानक मला काही ऐकू येईनासे झाले. हा एक मेंदूचा दुर्मिळ आजार आहे. मला दुर्मिळ सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉसचे निदान झाले आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

संवेदनाक्षम श्रवण क्षमता हानी (sensorineural hearing loss) ही एक प्रकारची श्रवण क्षमता हानी आहे. जी कानाच्या आतील भागातील संवेदनाक्षम पेशींमध्ये किंवा श्रवण तंतूंमध्ये होणाऱ्या समस्येमुळे होते. हे नुकसान सामान्यतः कानाच्या आतील भागातील कोकलीया (कोक्लिया) किंवा श्रवण नर्व्ह (ऑडिटरी नर्व) मध्ये होते. या आजाराची काय लक्षणे आहेत. ते आपण जाणून घेणार आहोत.

श्रवण क्षमता हानी होण्याचे कारणे : वयामुळे होणारी श्रवण क्षमता हानी (प्रेसबायक्युसिस) वयोमानानुसार होणारी श्रवण श्रमतेची हानी होणे. उच्च आवाजाचा परिणाम होतो. दीर्घकाळ उच्च आवाजात राहिल्याने कानाच्या आतील पेशींचे नुकसान देखील होणे. विभिन्न रोग आणि संक्रमण मैनिंजायटिस, मीजल्स, मंप्स सारख्या आजारामुळे. काही औषधे, विशेषतः ऑटो-टॉक्सिक औषधे. त्याचबरोबर आनुवंशिकता काही कुटुंबात श्रवण क्षमता हानी आनुवंशिक असू शकते. अनेक मस्तिष्काचे आजार स्ट्रोक, ट्यूमर इत्यादी. आजार देखील होण्याची शक्यता असते.

 लक्षणे : गर्दीत किंवा गोंधळाच्या ठिकाणी आवाजात बोलणे ऐकू न येणे. कानात सतत गूंज, किलकिले किंवा आवाज जाणवणे. समोरच्या व्यक्तीचे शब्द नीटसे न ऐकू येणे. श्रवणक्षमता कमी झाल्यामुळे टीव्ही किंवा रेडिओचा आवाज मोठा करून ऐकणे. हे सर्व लक्षणे दिसून येतात.

उपचार : कानात लावण्याचे श्रवण यंत्रे वापरून आवाज वाढवणे. जेव्हा श्रवण यंत्रे उपयोगी पडत नाहीत, तेव्हा कॉक्लियामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवले जातात. त्याचबरोबर श्रवण थेरपी, स्पीच थेरपी देखील घेतली जाते.

हे ही वाचा

Hum Dil De Chuke Sanam चित्रपटाची Silver Jubilee

आज मी जी काही आहे, ती फक्त…Varsha Gaikwad यांची भावनिक पोस्ट, म्हणाल्या..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss