Chandigarh University Case : चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचा कथित MMS लीक, पोलिसांची चौकशी सुरु

Chandigarh University Case : चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचा कथित MMS लीक, पोलिसांची चौकशी सुरु

मोहालीतील चंदिगड विद्यापीठात शिकणाऱ्यास आलेल्या ६० विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर ८ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. महिला वसतिगृहातील मुलींनी व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणीची चौकशी केली असता, एक व्हिडिओही समोर आला आहे. आरोपी विद्यार्थिनीचे म्हणणे आहे की, तिने दबावाखाली हा व्हिडिओ बनवला आहे, अधिक प्रश्न विचारल्यावर ती तिच्या फोनमधील एका मुलाचा फोटो दाखवत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा तिचा प्रियकर असून तो शिमलाचा ​​रहिवासी आहे. त्यांनी हे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. विद्यार्थिनीने फक्त तिचा व्हिडिओ त्या मुलाला पाठवला होता, असेही पोलिसांनी सांगितले. तर, इतर कोणत्याही मुली नाही असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : 

Jivitputrika Vrat 2022: ‘जीवितपुत्रिका व्रत’ संबंधात तुम्हला माहिती आहे का?, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडिओ समोर आल्यानंतर शनिवार-रविवारच्या रात्री चंदीगड विद्यापीठात मोठा गोंधळ सुरू झाला, जो आतापर्यंत सुरू आहे. विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय निदर्शने करत आहेत.पोलिस मुलीने स्वतःचा व्हिडिओ पाठवल्याचे सांगत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सांगत आहेत की, मुलीने अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवले आहेत आणि कडक कारवाईचे आश्वासनही दिले आहे.

ज्या विद्यार्थिनींचे व्हिडीओ व्हायरल झाला आहे तीत्या MBA मध्ये शिकत आहे. आरोपी विद्यार्थिनी बराच वेळ व्हिडिओ बनवून तिच्या मित्राला पाठवत होती. हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर एका विद्यार्थ्याने हा व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर गोंधळ सुरू झाला.

Maharashtra Cabinet : अखेर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?; ‘या’ दिवशी होणार विस्तार

हॉस्टेल वॉर्डनने आरोपी तरुणीला विचारपूस केली असता तिने सांगितले की, मी हे व्हिडिओ एका मुलाला पाठवले आहेत. मुलीने सांगितले की ती त्या मुलाला ओळखत नाही. वॉर्डनला अनेकदा विचारणा करूनही मुलीने या मुलाशी तिचे नाते काय आणि तो कोण आहे हे सांगितले नाही. तिला विचारण्यात आले की, ती कधीपासून हा व्हिडिओ बनवत आहे, विद्यार्थिनीने त्याचे उत्तरही दिले नाही. चूक झाली आहे आणि मी पुन्हा करणार नाही, असे ती पुन्हा पुन्हा सांगत राहिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर येथे दाखल, आजपासून सलग पाच दिवसांचा ‘मिशन विदर्भ’ दौरा

Exit mobile version