काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस काही काळ अमरनाथ यात्रा स्थगित

'जय बाबा बर्फानी'च्या जयघोषात १ जुलैपासून सुरु झालेली पवित्र अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) आज स्थगित करण्यात आली आहे.

काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस काही काळ अमरनाथ यात्रा स्थगित

‘जय बाबा बर्फानी’च्या जयघोषात १ जुलैपासून सुरु झालेली पवित्र अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) आज स्थगित करण्यात आली आहे. काश्मीरमधील खराब हवामानामुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पवित्र अमरेश्वर धमाची यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. कोणत्याही यात्रेकरुला अमरनाथ गुहेकडे जाण्याची परवानगी नाही. काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, हवामान पूर्ववत होईपर्यंत यात्रा स्थगित करण्यात आली आहे. हवामानात सुधारणा झाल्यावर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल. आज कोणत्याही यात्रेकरूंना गुहेकडे जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसामुळे यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. यात्रेकरूंना बालटाल आणि नूनवान बेस कॅम्पवर थांबवण्यात आलं आहे. हवामानात सुधारणा होताच अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४.४५ च्या सुमारास जम्मूतील बेस कॅम्पवरून ७,००० हून अधिक भाविकांची तुकडी अमरनाथ यात्रेसाठी रवाना करण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत २४७ वाहनांतून भगवती नगर बेस कॅम्पवरून भाविक घाटीच्या दिशेने निघाले होते.

अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन आणि श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने सर्वतोपरी तयारी केली आहे. यात्रेकरुच्या आरोग्यासाठी दोन तात्पुरती रुग्णालये सुद्धा उभारण्यात आली आहेत. जागोजागी कडेकोड सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण यात्रेचा मार्ग आणि आजूबाजूच्या परिसरावर इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC) मधून लक्ष ठेवलं जात आहे. सुरक्षेसाठी यात्रामार्गावर ड्रोनमार्फत प्रशासनाची करडी नजर आहे. यंदा अमरनाथ यात्रा ६२ दिवसांची असून ३१ ऑगस्टला संपणार आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांच निवडणूक आयोगाला पत्र, पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याची माहिती का दिली नाही?

भाजपकडून शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न? शिंदे-फडणवीस यांची रंगली तब्ब्ल एक तास बैठक…

Chandrayan Launch, ‘या’ दिवशी अवकाशात झेप घेणार Chandrayan 3

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version