spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

DSLR देखील फेल होईल iPhone 15 पुढे, डिझाइनसह कमालीचे अपग्रेड पाहून ग्राहक खुश

iPhone 15 लाँच व्हायला अजून एक वर्ष बाकी आहे. पण फोनबाबत अनेक लीक आणि अफवा समोर येत आहेत, ज्या ऐकून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की Apple पुढच्या वर्षी आयफोनच्या डिझाइनमध्ये बदल करणार आहे. येत्या वर्षात, आयफोन 15 मालिकेत पुष्ठ भाग आणि मागील भागाची डिझाइन देखील भिन्न असेल. आता फोनच्या कॅमेऱ्याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे, जो ऐकून चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल.

हेही वाचा : 

iPhone 15 च्या कॅमेर्‍याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की कंपनी iPhone 15 मध्ये Sony कॅमेरा सेंसर वापरणार आहे. ज्यामुळे कॅमेर्‍याचा दर्जा चांगला राहील. कंपनी पहिल्यांदाच असे काहीतरी करणार आहे. एका रिपोर्टनुसार, Apple iPhone 15 सीरीजमध्ये Sony चे नवीनतम ‘स्टेट ऑफ द आर्ट’ कॅमेरा सेन्सर वापरणार आहे. हा सेन्सर उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी कमी एक्सपोजर आणि ओव्हरएक्सपोजर कमी करण्यासाठी अधिक प्रकाश कॅप्चर करण्यास दर्जेदार ठरेल.

iPhone 15 मध्ये हटके डिझाइन

ग्राहक अनेक दिवसांपासून आयफोनमध्ये नवीन डिझाइन मिळण्याची वाट पाहत आहेत. आयफोन १२ पासून कंपनीच्या फोन्समध्ये समानच डिझाइन दिसत आहे. परंतु, रिपोर्टनुसार iPhone 15 Series मध्ये वेगळे डिझाइन पाहायला मिळू शकते. या डिझाइनमुळे कंपनीचे ग्राहक खुश होण्याची शक्यता आहे.

अपकमिंग आयफोनमध्ये टायटेनियम बॉडी दिली जाईल, जी डिव्हाइसचे वजन अजून कमी करेल. प्रो मॉडेल्समध्ये स्टँडर्ड मॉडेल्सच्या तुलनेत अ‍ॅल्यूमिनियम बॉडी दिली जाऊ शकते. डिझाइन व्यतिरिक्त फीचर्समध्ये देखील तुम्हाला बदल पाहायला मिळतील. यात नवीन चिपसेट मिळेल. विशेष म्हणजे अपकमिंग डिव्हाइसमध्ये लाइटनिंग पोर्टऐवजी यूएसबी-पोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे.

नवाब मलिकांच्या जमीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

Latest Posts

Don't Miss