Amazon great Indian Festival 2022: २३ सप्टेंबरपासून सुरू होणार अमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल, जाणून घ्या मोबाइल एक्सचेंज ऑफर आणि बरंच काही…

सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि २३ ऑक्टोबरपर्यंत चालेल.

Amazon great Indian Festival 2022: २३ सप्टेंबरपासून सुरू होणार अमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल, जाणून घ्या मोबाइल एक्सचेंज ऑफर आणि बरंच काही…

ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल २०२२ (Amazon Great Indian Festival Sale 2022) ची प्रतीक्षा आता संपणार आहे. या सेलमध्ये अनेक गोष्टींवर डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहेत. बरेच दिवस लोक या सेलची वाट पाहत होते. या सेलमध्ये मोबाईलपासून ते इतर गोष्टींवर बंपर डिस्काउंट मिळू शकतात.

आजकाल ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदीचे युग आहे. बहुतेक लोक ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करतात. अशा परिस्थितीत बंपर डिस्काउंटही मिळत असेल तर काय बोलावे. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल(Amazon Great Indian Festival) सेलमध्ये तुम्ही सर्व इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता.

नवीन स्मार्टफोनवर मिळू शकते सूट

ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मात्र, कंपनीने याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. असे सांगितले जात आहे की हा सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि २३ ऑक्टोबरपर्यंत चालेल. या ॲमेझॉन (Amazon) सेलमध्ये iQOO Z6 Pro 5G, Samsung, Apple यासह इतर ब्रँडेड मोबाईलवर सूट मिळू शकते.

यावर ६० ते ८० टक्के सूट मिळू शकते

या सेलमध्ये तुम्ही AC वर ५५ टक्के, रेफ्रिजरेटरवर ६० टक्के सूट मिळवू शकता. तुम्हाला खेळणी आणि मेकअपशी संबंधित उत्पादनांवर ६० ते ८० टक्के सूट मिळू शकते. तसेच घरगुती आणि स्वयंपाकघरातील उत्पादनांवर ५० ते ८० टक्के सूट मिळू या सेलमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

‘या’ ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल २०२२ असणार लाईव्ह

Liger OTT Release : जाणून घ्या…ओटीटीवर नक्की कधी पाहू शकणार ‘लायगर’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version