टेक्सासमध्ये ‘आय हेट यू इंडियन्स’ म्हणत, अमेरिकन महिलेनं भारतीय महिलेला दाखवली बंदूक

टेक्सासमध्ये ‘आय हेट यू इंडियन्स’ म्हणत, अमेरिकन महिलेनं भारतीय महिलेला दाखवली बंदूक

अमेरिकेत भारतीय वंशाच्या चार महिल्यांवर हल्ल्या झाल्याचे धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेरिकन-मेक्सिकन महिलेने टेक्सासच्या रस्त्यावर फिरणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलांशी गैरवर्तन तर केलं आहे. ही अमेरिकन महिला एवढ्यावरचं थांबली नाही तर तिने मारहाण केल्यानंतर बंदुकीतून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मेक्सिकन पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हल्ला करणारी महिला भारतीय-अमेरिकन महिलांसोबत गैरवर्तन करत आहे आणि त्यांना भारतात परत जाण्यास सांगत आहे. ती म्हणते मला भारतीयांचा तिरस्कार आहे.

हेही वाचा : 

बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

ती अमेरिकन महिला म्हणाली, ‘आय हेट यू इंडियन्स. हे सर्व लोक चांगल्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेत येतात”, आणि हा व्हिडिओ संपूर्ण अमेरिकेतील भारतीय-अमेरिकन समुदायामध्ये व्हायरल झाला आहे, ज्यांना या घटनेने धक्का बसला आहे. या मेक्सिकन-अमेरिकन महिलेचे नाव प्लॅनो येथील एसमेराल्डा अप्टन असे आहे.

ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे तो भारतीय-अमेरिकन महिलेचा मुलगा आहे. त्याने या घटने प्रकरणी आपले मत मांडले आहे. “माझ्या आईने त्या मेक्सिकन-अमेरिकन महिलेच्या गैरवर्तनाला शांतपणे प्रतिसाद दिला. ती हल्लेखोर महिलेला सतत अश्लील कमेंट करत होती. मेक्सिकन-अमेरिकन महिला आमच्या वर ओरडत होती. त्या महिलेचा उद्धटपणा वाढल्यावर आईने तिचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. हे पाहून तिला राग आला आणि तिने माझ्या आई आणि मित्रांवर हल्ला केला”.

शुभ प्रसंही आनंदावर विरजण, लग्नघरात आगीच्या भडक्यात ५ जणांनाचा मृत्यू

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टेक्सासमधील प्लानो शहरातील पोलिसांनी गुरुवारी दुपारपर्यंत एस्मेराल्डा अप्टन या महिलेला अटक केली. तिच्याविरोधात वांशिक हल्ला आणि दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्याचे कलम लावण्यात आले आहे. तसेच तिला 10 हजार अमेरिकन डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास होणार आता सुखकर

Exit mobile version