spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Amul Milk Price Hike, सर्वसामान्यांना मोठा धक्का, अमूल दुधाच्या दरात करण्यात आली ‘इतकी’ वाढ

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे. सर्वसामान्यांना मोठा धक्का बसेल अशी ही बातमी आहे. अवघ्या २ दिवसांपूर्वी अर्थसंकल्प (Budget) हा सादर झाला आहे.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे. सर्वसामान्यांना मोठा धक्का बसेल अशी ही बातमी आहे. अवघ्या २ दिवसांपूर्वी अर्थसंकल्प (Budget) हा सादर झाला आहे. त्यानंतर लगेच आज अमूल दुधाच्या दरात मोठी वाढ (Amul Milk Price Hike) करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने (Gujarat Cooperative Milk Marketing Federation Limited) दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

 गुजरात डेअरी सहकारी अमूलने आजपासून ताज्या दुधावर प्रतिलिटर ३ रुपयांपर्यंत दरवाढ जाहीर केली आहे. या पुनरावृत्तीनंतर, अमूल गोल्डची किंमत ६६ रुपये प्रति लीटर होईल. अमूल ताजा ५४ रुपये प्रति लिटर आणि अमूल गायीचे दूध ५६ रुपये प्रति लिटर आणि अमूल ए२ म्हशीचे दूध आता ७० रुपये प्रति लिटर असेल, असे अमूलने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे. मार्केटिंग फेडरेशनने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की अमूल पाऊच दुधाची (सर्व प्रकार) किंमत ३ फेब्रुवारीपासून प्रभावीपणे सुधारित करण्यात आली आहे.” एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. केवळ गुरांच्या चाऱ्याचा खर्च अंदाजे २० टक्क्यांपर्यंत वाढला आहे, असे अमूलने म्हटले आहे.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF), जे अमूल ब्रँड अंतर्गत डेअरी उत्पादनांचे मार्केटिंग करते, त्यांनी अखेरच्या ऑक्टोबरमध्ये त्यांच्या गोल्ड, ताझा आणि शक्ती दुधाच्या ब्रँडच्या किंमती २ रुपये प्रति लिटरने वाढवल्या आहेत. अमूल कंपनीने केलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका हा बसणार आहे.

हे ही वाचा:

अखेर पदवीधर निवडणुकांचा निकाल लागला, २९,४६५ मतांनी सत्यजित तांबेंनी मारली बाजी

जेवताना तोंडी लावायला घ्या.. Fresh Creamy Onion फ्लेवरच्या कांद्याच्या चकत्या

सलग तिसऱ्यांदा बदलली Rocky Aur Rani Ki Prem Kahani ची रिलीज डेट, ‘या’ तारखेला ठोठावणार चित्रपटगृहाचे दार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss