राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात वायू सेनेचं विमान कोसळलं

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात वायू सेनेचं विमान कोसळलं

आज सकाळपासून भारतीय हवाईदलाच्या (IAF) विमानांच्या अपघाताची येत आहे. एकीकडे मध्यप्रदेशात भारतीय हवाईदलाच्या (IAF) दोन लढाऊ विमानांच्या अपघाताची बातमी समोर आली होती. यामध्ये सुखोई-३० (Sukhoi 30) आणि मिराज २००० (Mirage 2000) ही विमानं कोसळली आहेत. तर आता राजस्थामध्ये देखील भारतीय हवाईदलाच्या एका विमानाच्या अपघाताची माहिती समोर येत आहे. ही घटना राजस्थानमधील भरतपूरमध्ये घडली आहे. पिंगोर रेल्वे स्टेशनजवळ भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळलं आहे. या अपघातात विमानाचे काही भाग वेगळे झाले असून विमानाने पेट घेतला. तर या फायटर जेटने आग्र्याहून उड्डाण केलं होतं अशी माहिती मिळाली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय टीम घटनास्थळी पोहोचली आहे. त्यापाठोपाठच भारतीय हवाई दलाचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.अपघाताची माहिती आम्हाला मिळाली आहे. नेमकं कोणतं विमान दुर्घटनाग्रस्त झालंय, याबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे. स्थानिकांनी या अपघातासंदर्भात सांगितल आहे की, हा अपघात सकाळी १० ते १०:३० च्या सुमारास झाला असून, विमान कोसळल्याच्या आवाजाने गावातले लोक घाबरले. गावातील शेकडो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावाच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी विमानाचे भाग विखुरले आहेत.

विमानाचा अपघात होताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले होते. स्थानिकांनी सांगितलं की, विमान पडलेल्या ठिकाणी जवळपास कुठेही विमानाचा पायलट दिसला नाही. दुर्घटनेपूर्वी पायलट सुरक्षितपणे विमानातून बाहेर पडला असावा.अद्याप या घटनेबद्दल भारतीय हवाई दलाने कोणतंही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे.

हे ही वाचा:

मुलाची जागा वाचवली तरी चालेल, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

मध्यप्रदेशमध्ये भारतीय हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानाचा भीषण अपघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version