spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चीनला चोख उत्तर देण्यासाठी भारताकडून उचलण्यात आले महत्वाचे पाऊल

भारतात G २० परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये २० देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि पाहुणे भारतात आले होते.

भारतात G २० परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये २० देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि पाहुणे भारतात आले होते. आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते G २० परिषदेचा समारोह करण्यात आला. ही परिषद संपल्यानंतर भारताकडून चीनला एक मोठा संदेश देण्यात आला. भारत लडाखच्या न्योमा भागात जगातलं सर्वात उंच लढाऊ हवाई क्षेत्राची निर्मिती करणार आहेत. या योजनेचा शिलान्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. १२क सप्टेंबर पासून जम्मूमध्ये देवक पुलापासून सुरुवात करण्यात येणार आहे.

एलएसीवर सुरु असलेल्या चीनसोबतच्या वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. पूर्व लडाखमधील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या न्योमा पट्ट्यात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे नवीन एअरफील्ड बांधण्यासाठी एकूण २१८ कोटी रुपये खर्च येणार आहे. चीनला चोख उत्तर देण्यासाठी या एअरफिल्डची रचना करणे हे भारताकडून उचलण्यात आलेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. मागच्या तीन वर्षपूर्वी पूर्व लडाखमधील न्योमा अॅडव्हान्स लँडिंग मैदानाचा वापर भारतीय सैन्यदलाकडून वापर केला जात आहे. २०२० मध्ये गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये अजूनही तणाव कायम आहे.

देशातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशाच्या सैन्य अधिकाऱ्यांकडून उच्च स्तरीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये देखील चर्चा करण्यात येणार आहे. भारत आणि चीनचा सीमा वाद हा नवीन नाही. भारतीय सैन्य दलाकडून चीनला जशास तसे उत्तर देण्यात येते. पण तरी देखील चीन नवनवीन वाद उखरूं काढत असतो. एअरफिल्ड उभारण्याचा निर्णय घेणं ही देखील चीनसाठी भारताकडून देण्यात आलेली एक सूचना आहे. यावर चीन काय भूमिका घेईल हे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा: 

Latest Posts

Don't Miss