आनंद महिंद्रांचा थेट नितीन गडकरी यांना मोठा सवाल म्हणाले…

आनंद महिंद्रा हे देशातील नामांकित उद्योजकांपैकी एक आहेत. आनंद महिंद्रा हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरपर्सन आहेत.

आनंद महिंद्रांचा थेट नितीन गडकरी यांना मोठा सवाल म्हणाले…

आनंद महिंद्रा हे देशातील नामांकित उद्योजकांपैकी एक आहेत. आनंद महिंद्रा हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरपर्सन आहेत. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह असतात. आनंद महिंद्रा यांची सोशल मीडियावर मोठ्या संख्येने चाहते आहेत. अनेकजण आनंद महिंद्रा यांना प्रेरणास्थानी मानतात. आनंद महिंद्रा नेहमी ट्विटरवर (Twitter) व्हिडीओज शेअर करतात. आनंद महिंद्रा याना ट्विटरवर देखील अनेकजण फॉलो (Follow) करतात. अनेकजण हे महिंद्रा यांच्या पोस्टचे सुद्धा चाहते आहेत. त्यामुळे बरेच युझर्स (Users) त्याच्या पोस्टची वाट पाहत असतात. सध्या पुन्हा महिंद्रा यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. आणि त्या व्हिडिओद्वारे त्यांनी चक्क रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी याना टॅग करत प्रश्न विचारला आहे.

आनंद महिंद्रा यांनी एका ट्विटमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये नेदरलँडमधील वेलुवेमेयर एक्वाडक्ट्स ब्रिज (Veluwemeyer Aqueducts Bridge) दिसून येते आहे. हा ब्रिज इतका सुंदर आहे की त्याने आनंद महिंद्रा यांच्यावर देखील भुरळ घातली. हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “नितीन गडकरी जी, आपणही हे करू शकतो का?”. महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ हा मुळात इंजिनिअर इन्सायडर (Engineering Insider) या नावाच्या आकाउंटने त्यांच्या ट्विटर हॅन्डल वरून ट्विट केला होता. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला.

आनंद महिंद्राच्या या ट्विटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. महिंद्राच्या या ट्विट युझर्स कडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. बऱ्याच जणांनी या ट्विटला गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही जणांनी देशातील गंभीर आणि वास्तविक समस्यांबाबत भाष्य केलं. काही जणांनी यावर खोचक टीका देखील केली. भारतात अशा पूलची गरज काय अशा शब्दात देखील प्रतिक्रिया दिल्या. बऱ्याच युजर्सने त्यांची मते मांडली. मात्र बहुतेकांनी या पुलंचे कौतुकही केले.

हे ही वाचा:

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत मिळणार

सौरभ बनला ‘फौजी’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version