spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आज अंगारक चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि पूजा करण्याची पद्धत

९ ग्रहांमध्ये मंगळाचेही विशेष महत्त्व आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत हा ग्रह अशुभ स्थितीत असतो तेव्हा त्याला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या ग्रहाचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी अनेक उपाय केले जातात. अंगारक चतुर्थीला हे उपाय केल्यास ते अधिक शुभ होते. यावेळी मंगळवार, १३सप्टेंबर २०२२ रोजी अंगारक चतुर्थी चा योग येत आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते. या दिवशी गणपतीला त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने इच्छित फळ मिळते. या दिवशी बनवल्या जाणार्‍या शुभ योग आणि उपासना पद्धतीबद्दल अधिक माहिती घ्या.

हेही वाचा : 

मुंबई-उपनगरात पाऊस सुरूच, लोकल सेवेवर परिणाम

हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी मंगळवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३७ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे, बुधवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.२३ वाजता समाप्त होईल. मात्र संकष्टी चतुर्थी १३ सप्टेंबरलाच साजरी होणार आहे. या दिवशी अश्विन नक्षत्र असल्यामुळे अमृत नावाचा शुभ योग तयार होईल. याशिवाय सर्वार्थसिद्धी, वृद्धी आणि ध्रुव नावाचे इतर ३ योगही या दिवशी राहतील.

राशी भविष्य १३ सप्टेंबर २०२२, मकर राशीच्या लोकांनी आजचा दिवस पितरांना समर्पित केल्याने आत्मिक समाधाना मिळेल

अंगारक चतुर्थीला हनुमानजीची पूजा फलदायी राहते. जर तुमच्या कुंडलीत मंगल दोष असेल तर त्याचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी अंगारक चतुर्थीच्या दिवशी मंगळाशी संबंधित मंत्रांचा जप करा. त्यापूर्वी मंगळदेवाची पूजा अवश्य करावी.मंगळ ग्रहापासून शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी मंगळ यंत्राची पूजा केली जाते अंगारक चतुर्थीच्या दिवशी नदीत लाल मसूर टाका किंवा ब्राह्मणाला दान करा. गणेशाला अक्षता, धूप, दिवा, कापूर, लवंग आणि दुर्वा अर्पण करा. बाप्पाल चंदनाचं तिलक लावा. त्यानंतर त्यांना लाडू अर्पण करावेत. यानंतर गणपतीची आरती करून त्यांच्या मंत्रांचा जप करावा. तेव्हा तुमचे संकट दूर होण्यासाठी देवाला प्रार्थना करा.

हृदयाची काळजी कशी घ्यावी

Latest Posts

Don't Miss