कर्नाटकमध्ये सुंदर हत्तीचं निधन होऊनही न कळवल्याने भाविकांमध्ये नाराजी

कोल्हापुरातील (Kolhapur) जोतिबा मंदिरात (Jotiba Temple) वास्तव्यास असलेल्या 'सुंदर' हत्तीचे (Sundar Elephant) कर्नाटकमध्ये (Karnataka) निधन होऊनही कळवलं नसल्याने भाविकांमध्ये नाराजी असल्याचं चित्र दिसत आहे.

कर्नाटकमध्ये सुंदर हत्तीचं निधन होऊनही न कळवल्याने भाविकांमध्ये नाराजी

कोल्हापुरातील (Kolhapur) जोतिबा मंदिरात (Jotiba Temple) वास्तव्यास असलेल्या ‘सुंदर’ हत्तीचे (Sundar Elephant) कर्नाटकमध्ये (Karnataka) निधन होऊनही कळवलं नसल्याने भाविकांमध्ये नाराजी असल्याचं चित्र दिसत आहे. इतकंच नाही तर आमदार विनय कोरे (Vinay Kore) देखील चांगलेच भडकले आहेत. सुंदर हत्तीच्या निधनाची माहिती कळवायला उशीर का केला, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दख्खनचा राजा कुलदैवत जोतिबा देवाचा मानकरी असलेल्या ‘सुंदर’ हत्तीचा २७ ऑगस्ट रोजी मृत्यू होऊनही कोणतीच माहिती वारणा उद्योग व शिक्षण समूहाला न दिल्याने भाविकांसह वारणा खोऱ्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुंदरच्या भेटीसाठी गेलेल्या भक्तांना सुंदरच्या निधनाची वृत्त समजताच धक्का बसला. त्यांनी तात्काळ आमदार विनय कोरे यांना मोबाईलवरुन संपर्क साधून माहिती दिली. निधनाचं वृत्त समजताच त्यांना अश्रू अनावर झाले. विनय कोरे यांनी वारणा उद्योग समूहाच्या वतीने सुंदर हत्तीला श्रद्धांजली वाहिली.

वारणा समूहाकडून ‘सुंदर’ हत्ती जोतिबा देवाला अर्पण करण्यात आला होता. परंतु ‘पेटा’ या संस्थेने हत्तीचा छळ होतो, त्याची साखळदंडातून मुक्तता करुन प्राणी संग्रहालयात सोडावं, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुंदर हत्तीला वारणेतून कर्नाटक इथल्या बाणेरगठ्ठा पार्कमध्ये नेण्यात आलं होतं. मात्र या हत्तीचे बाणेरगठ्ठा पार्कमध्ये निधन झाल्याची माहिती मिळताच जोतिबाच्या भक्तांमध्ये दुःख पसरले आहे.

सुंदरची देखभाल वारणा समूहाकडून सुरु असतानाच सर्वोच्च न्यायालय सुंदरला जंगलात सोडण्याचे आदेश दिल्यानंतर जून २०१४ मध्ये वारणेतून कर्नाटकमधील बाणेरगठ्ठा पार्कमध्ये सुंदर हत्तीला नेण्यात आले होते. कोल्हापूरमधील जोतिबा भक्त सुंदर हत्तीसाठी केळी, सफरचंद घेऊन खास भेटण्यासाठी जात असत. दोनच दिवसांपूर्वी काहीजण बाणेरगठ्ठा पार्कमध्ये गेले असता तिथल्या प्रशासनाने सुंदर हत्तीचं २७ ऑगस्ट रोजी निधन झाल्याचं सांगितले.

या भक्तांनी आमदार विनय कोरे यांना फोन करुन याची माहिती दिली. यानंतर आमदार कोरे चांगलेच भडकले. निधनाची माहिती उद्योग समूहासह जोतिबा देवस्थानला देणं आवश्यक होतं. मात्र, तशी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सुंदर हा जोतिबा दैवताच्या पालखीचा मानकरी होता. त्याच्या निधनाची माहिती कळवायला उशीर का केला असा सवाल त्यांनी विचारला. तर दुसरीकडे भाविकांमध्येही प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. सुंदर हत्तीच्या निधनाने भाविकांमध्ये दु:ख पसरलं आहे.

हे ही वाचा:

Congress President : मल्लिकार्जुन खर्गे आज अध्यक्षपदाची सुत्रे घेणार हाती

Diwali 2022 : देवेंद्र फडणवीस रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी; काय आहे कारण?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version