spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Anant Ambani यांच्या शाही सोहळ्यात झळकलेली ‘ती’ सौंदर्यवती आहे तरी कोण ?

या कार्यक्रमात अतिशय साधा मेकअप, साजेशीर दागिने, सुंदर ड्रेस परिधान करुन एका तरुणीने आपल्या नवऱ्यासोबत हजेरी लावली. पापराझींने तिला कॅमेऱ्यात कैद केलं आणि तिची चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली. पण ती सौंदयर्वती आहे तरी कोण ? 

अनेक दिवसांपासून सध्या एकाच सोहळ्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. उद्योगपती मुकेश अंबांनी(Mukesh Ambani)  आणि नीता अंबांनी (Neeta Ambani) यांचे चिरंजीव अनंत अंबांनी (Anant Ambani) यांच्या लग्न सोहळ्याची संपूर्ण देशभरातच नव्हे तर जगभरात त्याची चर्चा सुरु आहे.५ जुलै रोजी शाही संगीत सोहळा पार पडला. त्यावेळी अनेकांनी हजेरी लावली. सर्वचजण सजून-धजून सोहळ्याला आले होते. या कार्यक्रमात अतिशय साधा मेकअप, साजेशीर दागिने, सुंदर ड्रेस परिधान करुन एका तरुणीने आपल्या नवऱ्यासोबत हजेरी लावली. पापराझींने तिला कॅमेऱ्यात कैद केलं आणि तिची चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली. पण ती सौंदयर्वती आहे तरी कोण ? 

अनंत अंबांनी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट(Radhika merchant)यांच्या या सोहळ्याला हजेरी लावणारी ती सौंदयर्वती दुसरी तिसरी कोणी नसून राधिका मर्चंट हिची मोठी बहिण अंजली मर्चंट-मजिठिया. (Anjali Merchant Majithia) ही आहे. संगीत सोहळा, गृहशांती, आणि या शाही सोहळ्यात साधा आणि सिंपल लूक करुन अंजलीने सर्वांचंच लक्ष वेधलं. अंजली आणि राधिका या एकमेकांच्या केवळ बहीणीच नसून खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.अंजली मर्चंट ही फिटनेस फ्रिक असून ती स्वत: एक उद्योजिका आहे. तिच्या स्टाईलने अभिनेत्रींना देखील ती टक्कर देते. 

भारतीय उद्योगपती विरेन मर्चंट (Viren Merchant)यांची मुलगी अंजली मर्चंट ही ‘ड्रायफिक्स’ची सह-संस्थापक आहे. २०२० मध्ये अंजली मर्चंट हिने अमन मजिठिया ( Aman Majithia) याच्यासोबत लग्नगाठ बांधली.या दोघांना एक गोड गोंडस मुलगा देखील आहे. ती आपल्या वडिलांचा व्यवसाय देखील सांभाळते. राधिकाच्या लग्नसराईत अंजली ही प्रामुख्याने दिसून येत आहे. मर्चंट दाम्पत्याच्या या दोन्ही मुली तितक्याच सालस आणि सुंदर आहेत. बहिणीच्या या विशेष सोहळ्यात अंजली एकमक खुलून दिसत आहे. राधिका सोबत तिच्या मोठ्या बहिणीची चर्चा सोशल मिडियावर चांगलीच पसंती दिली आहे. 

गद्दार लोकांच्या सेनेमुळे अशा घटनांना वाव, म्हणून Mumbai तुंबते, काय म्हणाले Ambadas Danve?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss