आणखी एका लैंगिक छळाच्या दोषी आसाराम बापू, उद्या होणार शिक्षेची घोषणा

२०१३ मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी नारायण साई आणि त्याचे वडील आसाराम यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

आणखी एका लैंगिक छळाच्या दोषी आसाराम बापू, उद्या होणार शिक्षेची घोषणा

गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूंना सोमवारी (३० जानेवारी) दोषी ठरवले आहे. गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूला २०१३ मध्ये सुरतमधील दोन बहिणींवर झालेल्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. आसाराम यांचा मुलगा नारायण साईही या प्रकरणात आरोपी होता. आसारामची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या चार महिला अनुयायांनाही या प्रकरणात आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. या सर्वांची गांधीनगर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात आहे. आसारामला उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.

२०१३ मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी नारायण साई आणि त्याचे वडील आसाराम यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. २००२ ते २००५ दरम्यान नारायण साईने वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचे लहान बहिणीने तक्रारीत म्हटले आहे.सुरतमधील आसाराम बापूच्या आश्रमात राहात असताना तिच्यावर बलात्कार झाला, असे मुलीने सांगितले. दुसरीकडे, मोठ्या बहिणीने तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता.

अहमदाबाद येथील आश्रमात आसारामने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले. दोन्ही बहिणींनी पिता-पुत्राच्या विरोधात स्वतंत्र तक्रारी केल्या आहेत. आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात आहेत. २०१८ मध्ये, जोधपूर न्यायालयाने त्याला एका वेगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१३ मध्ये जोधपूरच्या आश्रमात १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तो दोषी आढळला होता.

तुरुंगात असलेल्या आसाराम बापूने नुकताच न्यायालयात जामीन मागितला होता. जामीन अर्जात आसारामने म्हटले होते की, आपण गेल्या १० वर्षांपासून तुरुंगात आहोत. त्याचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. तो गंभीर आजाराने त्रस्त आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्या जामीन अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याला योग्य उपचार मिळावेत म्हणून जामीन देण्याचे आदेश द्यावेत.

हे ही वाचा:

क्रिकेट जगतातील महत्त्वाची बातमी, न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आधी या भारतीय सलामवीराने क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

संत तुकाराम महाराजांची बदनामी करणा-या भोंदू धीरेंद्र शास्त्रीने तात्काळ माफी मागावी, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version