Tuesday, July 2, 2024

Latest Posts

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ यासाठी अर्ज ‘असा’ करता येणार ; जाणूयात सविस्तर

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.

पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. आज विधिमंडळ तिसरा दिवस आहे. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला. विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने या अर्थसंकल्पात अनेक घोषणा देण्यात आल्या.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Behna Yojana), मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेची अंमलबजावी केली जाणार आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. जुलै २०२४ पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण योजना’ तात्काळ लागू झाली आहे. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत.

  • लाभार्थ्यांचे वय : २१ ते ६० वय असलेल्या महिला 
  • अट : वर्षाला आवक २,५०,५०० पेक्षा कमी

या योजना अंर्तगत  लाभार्थी महिलांना १५०० रुपये प्रति माह दिले जाण्याची शक्यता आहे. कमीतकमी ३.५० कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे.

योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार?

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे.
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
  • किमान वयाची २१ वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते असणं आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम २.५० लाखांपेक्षा जास्त नसावं.

 अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :

  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
  • लाभार्थ्यांचं आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला
  • राक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न २.५० लाखापर्यंत असणं अनिवार्य (५) बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशनकार्ड
  • सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र
  • लाभार्थी निवड ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या’ लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु
  • सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी यांनी আतरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज
  • सक्षम अधिकारी याच्याकडे सादर कराया, राम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता
  • अंगणवाडी सेविका/पर्यवेशिका मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या
  • जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निक्षित करण्यात येत आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया :

  • अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल ॲपद्वारे/सेतु सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया तुम्ही फॉलो करू शकता.
  • पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
  • त्यानंतर मिळणारी रक्कम दरमाहा पात्र महिलांना आधार लिंक केलेल्या बँक खात्यांत हस्तांतरीत केलं जाईल.

हे ही वाचा:

“तिजोरीत खळखळाट, अन् थापांचा सुळसुळाट” असे म्हणत पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस दणाणून सोडला

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss