Army Day देश साजरा करणार ७५वा लष्कर दिवस, दिल्लीबाहेर पहिल्यांदाच होणार परेडचे आयोजन

या दिवशी भारतीय जवानांना त्यांच्या यश, कर्तृत्व, देशसेवा आणि बलिदानासाठी सन्मानित केले जाते.

Army Day देश साजरा करणार ७५वा लष्कर दिवस, दिल्लीबाहेर पहिल्यांदाच होणार परेडचे आयोजन

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बेंगळुरूमध्ये भारतीय लष्कर दिन साजरा केला जात आहे. आतापर्यंत राजधानी दिल्लीच्या कॅन्टोन्मेंटमध्ये लष्कर दिनाचे आयोजन केले जात होते. पण, इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा दिल्लीव्यतिरिक्त इतर ठिकाण यासाठी निवडले गेले आहे. दरवर्षी १५ जानेवारीला साजरा होणाऱ्या या खास दिवसासाठी यंदा बेंगळुरूची निवड करण्यात आली आहे आणि यालाही काही विशेष कारणे आहेत.

लष्कर दिन १५ जानेवारीलाच का साजरा केला जातो?

यावर्षी देश ७५ वा लष्कर दिन साजरा करत आहे. १५ जानेवारी १९४९ ही तारीख भारतीय लष्करासाठी खूप महत्त्वाची आहे. ही तीच तारीख आहे जेव्हा ब्रिटीश राजवटीनंतर प्रथमच एखाद्या भारतीयाला देशाच्या सैन्याची कमान देण्यात आली होती. प्रथमच भारतीय लष्करी अधिकाऱ्याला लष्कराचे कमांडर-इन-चीफ पद देण्यात आले. ज्याला तिन्ही सैन्यांचे प्रमुख म्हटले जायचे. केएम करिअप्पा यांनी जनरल सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारून इतिहास रचला. त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा ते ४९ वर्षांचे होते. केएम करिअप्पा १९५३ मध्ये निवृत्त झाले आणि १९९३ मध्ये वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

अशा प्रकारे १५ जानेवारीला भारतीय सेना दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी ७५ वा भारतीय सेना दिन देशात साजरा होत आहे. या दिवशी भारतीय जवानांना त्यांच्या यश, कर्तृत्व, देशसेवा आणि बलिदानासाठी सन्मानित केले जाते. भारतीय लष्कर दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये भारतीय लष्कराची ताकद दाखवण्यात येते. यासोबतच लष्कराने भविष्यासाठी किती तयारी केली आहे आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत किती बदल करण्याची तयारी आहे हेही दाखवण्यात येते.

लष्कर दिनासाठी बेंगळुरूची निवड का करण्यात आली?

हे ही वाचा:

Army Day 2023, आज भारतीय लष्कर झाले ७५ वर्षांचे, जाणून घ्या भारतीय सैन्य दिवस दिवसाचा इतिहास

Nepal Aircraft Crash, ७२ जणांसह नेपाळचे विमान धावपट्टीवर कोसळले, बचाव कार्य सुरू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version