अरविंद केजरीवाल यांचे केंद्र सरकारला आवाहन; ‘नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी गणेशाचे फोटो’

आम आदमी पक्षाचे (Aam Admi Party) संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारला (Central Government) महत्त्वाची सूचना केली आहे.

अरविंद केजरीवाल यांचे केंद्र सरकारला आवाहन; ‘नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी गणेशाचे फोटो’

आम आदमी पक्षाचे (Aam Admi Party) संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारला (Central Government) महत्त्वाची सूचना केली आहे. त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला महत्त्वाचे आवाहन केले आहे. भारतीय रुपयावर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेश यांचा फोटो असायला हवा, असे ते म्हणाले. त्यामुळे सुख-समृद्धी येईल आणि संपूर्ण देशाला त्याचा आशीर्वाद मिळेल. नव्या नोटांनी याची सुरुवात करता येईल, असे ते म्हणाले. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, “एकीकडे देशाचं चलन कमकुवत होत आहे तर अर्थव्यवस्थाही दोलायमान परिस्थितीत आहे. आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा ईश्वराची आठवण होते. आपण दिपावलीला लक्ष्मीपूजन केलं. यावेळी आपण लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली. अत्यंत गंभीर परिस्थितीतही आपण देवावर विश्वास ठेवतो. अशा परिस्थितीत माझं आवाहन आहे की, भारतीय चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे फोटो छापावेत.” यावेळी केजरीवाल म्हणाले की, “नोटेवर गांधीजींचा फोटो तसाच ठेवावा, पण मागच्या बाजूला देवांचा फोटो लावावा.”

ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था वाईट टप्प्यातून जात आहे, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. भारत समृद्ध देश व्हावा, लोकांनी श्रीमंत व्हावे अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी अनेक पावले उचलावी लागतील. आपल्याला रुग्णालये बांधावी लागतील, मोठ्या प्रमाणात शाळा उघडाव्यात. पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत.

देवाचा आशीर्वाद असेल तेव्हाच आमचे प्रयत्न यशस्वी होतील, असे केजरीवाल म्हणाले. ते म्हणाले की, अनेकवेळा असे घडते की, मेहनत करूनही फळ मिळत नाही. या प्रकरणात, देवाचे आशीर्वाद आवश्यक आहेत. जेव्हा देवतांचा आशीर्वाद असतो तेव्हा त्याचे परिणाम मिळू लागतात.

हे ही वाचा:

कर्नाटकमध्ये सुंदर हत्तीचं निधन होऊनही न कळवल्याने भाविकांमध्ये नाराजी

Whatsapp : व्हॉट्सॲप बंद पडल्यास हे असतील बेस्ट ऑपशन

‘चलो अयोध्या’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार रामलल्लाच्या दर्शनाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version