Aryan khan ड्रग्ज प्रकरणाला नवे वळण, समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर लाच प्रकरणी सीबीआयने चौकशी केली होती.

Aryan khan ड्रग्ज प्रकरणाला नवे वळण, समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर लाच प्रकरणी सीबीआयने चौकशी केली होती. आता पुन्हा एकदा या प्रकरणाला वळण आले आहे. आता आणखी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. शाहरुख खानवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. लाच प्रतिबंधक कायद्यानुसार लाच घेणाऱ्यासह लाच देणाराही तितकाच दोषी आहे असे या याचिकेमध्ये सांगण्यात आले आहे. वकील निलेश ओझा यांनी या याचिकेवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सुनावणी व्हावी असे सांगितले आहे.

सीबीआयच्या एफआयआरमध्ये नोंदवण्यात आले आहे की, शाहरुख खानने आर्यन खानला वाचवण्यासाठी समीर वानखेडे यांना ५० लाख रुपये लाच दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शाहरुख खानने जर लाच दिली असेल तर तो सुद्धा आरोपी आहे असे या याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे. वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयनं गंभीर आरोप केले आहेत.

 

आर्यन खानची सुटका करण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागितले होते त्यानंतर त्यांची डील १८ कोटींना पक्की झाली होती. समीर वानखडे यांच्या मते किरण गोसावींने ५० लाखाचं आगाऊ पेमेंट घेतलं होत. एवढेच नव्हे तर महागडी गाडी आणि हाय-फाय ब्रँड्सच्या कपड्यांबद्दल वानखेडेंनी सांगितले आहे त्याचबरोबर परदेश दौऱ्या संदर्भामध्ये काही बाबी लपून ठेवल्या आहेत. असा सीबीआयचा अंदाज आहे.

हे ही वाचा:

लवकरच गाड्यांचा वेग वाढणार, Nitin Gadkari यांनी दिली माहिती!

Sharad Pawar यांना धमकी देणारा आरोपी गजाआड!

तुम्ही Dahi Toast कधी ट्राय केला आहे का? नसेल तर ही लज्जतदार रेसिपी फक्त तुमच्या साठी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version