विमान भाड्यात तब्बल 50 टक्के कपात! जाणून घ्या काय असतील नवे दर

सरकारने हवाई भाड्यांवरील फेअर कॅप रद्द केल्याची माहिती आता समोर येत आहे

विमान भाड्यात तब्बल 50 टक्के कपात! जाणून घ्या काय असतील नवे दर

वाढती महागाई, वाढता रेपो रेट त्याचा दैनंदिन जीवनावर होणार परिणाम यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच वाढत्या महागाईमुळे विमान तिकिटाचे दार देखील सामान्य नागरिकांच्या हाताबाहेर गेले आहेत. पण या आर्थिक चढाओढीच्या काळात दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने हवाई भाड्यांवरील फेअर कॅप रद्द केल्याची माहिती आता समोर येत आहे.त्यामुळे आता गेला संपूर्ण काळ आभाळाला भिडलेले विमान तिकिटाचे दर कुठेतरी कमी होणार आहेत आणि त्यामुळे प्रवाश्यांसाठी विमान प्रवास करणं काहीस स्वस्त होणार आहे.

वृत्तानुसार, सरकारने गेल्या आठवड्यातच फेअर कॅपचे बंधन रद्द केले होते. फेअर कॅप म्हणजे कंपन्या भाडे निश्चित मर्यादेपेक्षा कमी ठेवू शकत नाहीत आणि वरच्या मर्यादेपेक्षा जास्त भाडे वाढवू शकत नाहीत. मात्र, याचे बंधन संपल्यानंतर, बाजारपेठेतील वाढती स्पर्धा पाहता, कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पूर्ण तयारी करत आहेत. यामुळेच आकाश एअर (Akasa Air), इंडिगो (Indigo), एअर आशिया (AirAsia), गो फर्स्ट (GoFirst) आणि विस्तारा (Vistara) सारख्या कंपन्यांनी त्यांच्या भाड्यात मोठी कपात केली आहे.

देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोनेही आकासा हवाई मार्गावरील सर्व भाड्यात कपात केली आहे, तर गो-फर्स्टनेही या मार्गावरील भाड्यात कपात केली आहे. तर अवघ्या महिन्याभरापूर्वी सुरू झालेल्या आकासा एअर या विमान कंपनीने आपल्या दरात कपात केली आहे. मुंबई-बेंगलोर मार्गावर २,००० ते २,२०० आणि त्याचप्रमाणे मुंबई-अहमदाबादचे भाडे गेल्या महिन्यापर्यंत ५,००८ होते, ते आता १,४०० रुपयांवर आले आहे.

गेल्या महिन्यापर्यंत विमान कंपन्या दिल्ली ते लखनौसाठी३,५०० ते ४,००० रुपये आकारत असताना, आता ते १,९०० ते २,२०० रुपयांवर आले आहेत. या मार्गावरील सर्वात स्वस्त भाडे एअर एशिया आणि इंडिगोचे आहे. त्याचप्रमाणे कोची आणि बंगळुरू दरम्यानचे विमान भाडे १,३०० रुपयांवर आले आहे. गो-फर्स्ट, इंडिगो आणि एअरएशिया या मार्गावर सर्वात कमी भाडे आकारत आहेत. मुंबई-जयपूर मार्गावरील विमानभाडे काही दिवसांपूर्वी ५,००० ते ५,५०० रुपये होते, ते आता ३,९०० रुपयांवर आले आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भाडे कमी करणे हा बाजारातील वाढलेल्या स्पर्धेचा परिणाम आहे. सर्व विमान कंपन्या त्यांच्या भाड्यात कपात करत आहेत, जे या क्षेत्राच्या वेगवान वाढीचे संकेत देत आहेत. यामुळे मागणी वाढेल आणि कोरोना महामारीचा सामना करणाऱ्या विमान उद्योगाला मदत होईल.

हे ही वाचा:

‘बाय बाय यश समीर…’ म्हणत सोशल मीडियावर केला फोटो शेअर

सुरेश रैनाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version