spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Astronaut Sunita Williams यांनी अंतराळातून साधला पत्रकारांशी संवाद

‘नासा’च्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Astronaut Sunita Williams) सहकारी बॅरी विल्मोर यांच्यासोबत दीर्घकाळापासून अंतराळात अडकल्या आहेत. हे मिशन केवळ ८ दिवसांचे होते, परंतु अंतराळ यानामधील तांत्रिक दोषामुळे अद्याप अंतराळातून परत आलेले नाहीत. अंतराळ प्रवास ५ जून रोजी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या बोईंग स्टारलाइनरच्या (Boeing Starliner) पहिल्या उड्डाणाने सुरू झाला. परंतु स्टारलाइनरमधील हेलियम गळती आणि थ्रस्टरमधील खराबीमुळे परतीची मोहीम थांबवावी लागली. सुनीता विल्यम्स सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुरक्षित आहेत, परंतु अंतराळात दीर्घकाळ राहणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

भारतीय वंशाची सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे नासाचे दोन अंतराळवीर अनेक आठवड्यांपासून अवकाशात अडकले आहेत. त्यांना पृथ्वीवर सुरक्षित आणणं अजूनही शक्य झालेलं नाहीय. त्यामुळे सर्वचजण चिंतेत आहेत. नासाच्या बोइंग स्पेस कॅप्सूलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर अवकाशात अडकून पडले आहेत. त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या सर्व चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्टेशनवरुन पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. सुनीता विलियम्स आणि बॅरी विल्मोरने (Bari Judžin Vilmor) बोइंग स्टारलायनर कॅप्सूल त्यांना पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित घेऊन येईल असा विश्वास व्यक्त केला. अपयशी होण्याचा प्रश्नच नाही असं विल्मोर म्हणाले. परतण्यासाठी NASA आणि बोइंगकडून पृथ्वीवर सुरु असलेल्या थ्रस्टर चाचण्या महत्त्वाच्या आहेत, असं विल्मोर म्हणाले.

५ जूनला फ्लोरिडा येथून स्टारलायनरने विलियम्स आणि बॅरी विल्मोर यांनी अवकाशात प्रयाण केलं. पुढच्याच दिवशी ते ISS वर ते उतरले. तिथे ते आठ दिवस थांबणार होते. पण स्टारलायनरमधील कमतरतेने त्यांच मिशन अनिश्चितकाळासाठी लांबलं. सुनीता आणि बॅरी स्पेस स्टेशनपर्यंत पोहोचेपर्यंत स्टारलायनरचे २८ पैकी ५ थ्रस्टर्स खराब झाले. हे खराब झालेले थ्रस्टर्स दुरुस्त करण्याच काम सुरु आहे.

प्रेस कॉन्फरन्समध्ये भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स यांना पाहून हितचिंतकांनी सुटकेचा निश्वास सुटला. चिंता करण्याची गरज नाही, हे नासाने आधीच स्पष्ट केलय. पण त्या पृथ्वीवर कधी परतणार हे नासाने अजून सांगितलेलं नाही. सुनिता यांनी अवकाशातील त्यांचा अनुभव पत्रकार परिषदेत शेअर केला. अवकाशातून त्यांनी एका छोट्या वादळाला चक्रीवादळात बदलताना पाहिलय. असे ही यात सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

CHAMPIONS TROPHY 2025 साठी भारत पाकीस्तानला जाणार ?

MUKHYAMANTRI MAJHI LADKI BAHIN YOJANA: फॉर्म तर भरला पण पैसे कधी मिळणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss