spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Asaduddin Owaisi असुद्दीन ओवेसींनी भारत-चीन वादावरून केंद्रावर ताशेरे ओढत म्हणाले, भारताकडे चांगले सैनिकी बळ आहे पण पंतप्रधान…

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे नुकत्याच झालेल्या भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. दरम्यान, (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी चीनच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला घेरले आहे. माध्यमांशी संवाद साधताना ओवेसींनी पंतप्रधान मोदी यांना टीकेचा धनी बनवला आहे.

हेही वाचा : 

Sanjay Raut सरकार बदलणार सर्वांचा हिशोब पूर्ण होणार, मविआच्या मोर्चाला परवानगी न मिळाल्याने संजय राऊत संतापले

ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मोदींवर आरोप करत म्हटलं आहे की,”भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये होणारे हल्ले झाकून नेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहेत. या विषयवार संसदेत बोललेच पाहिजेत. आमच्या लोकांपासून खऱ्या गोष्टी का लपवून ठेवण्यात येत आहेत?”

याचबरोबर ओवैसी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत मोदींवर हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटलं आहे,” भारताकडे चांगले सैनिकी बळ आहे पण कमजोर पंतप्रधान आहेत. जे ची च नाव घायला देखील घाबरतात. देश आणि नेत्यांविषयी विचारलेल्या प्रश्नांपासून ते दूर पाळतात. त्याचबरोबर ओवैसी यांनी पुढे म्हटलं आहे कि याच उत्तर संसदेत चर्चा केल्यानंतरच मिळू शकते. यापुढे एका इंग्रजी वृत्तपत्राचा दाखल देत ओवैसी पुढे म्हणाले कि, कि जर हे खरं असेल तर चीनसोबत सीमा असलेल्या राज्यामध्ये परिस्थिती आणखीच गंभीर आहे. म्हणजे लदाख पासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हा प्रश्न आणखीच गंभीर आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना मोदींना उत्तर द्यावेच लागेल.

Mumbai Fire News मुंबई लोअर परळ भागातील अविग्नॉन पार्क इमारतीच्या ३५व्या मजल्याला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

खरतर,ओवैसी यांनी “द टेलिग्राफ ” या माध्यमावर छापलेल्या एका बातमीचा दाखल देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारतातील सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी या माध्यमाला सांगितले कि, देशाच्या पूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेशमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांनामध्ये प्रत्येक महिन्याला हल्ल्याच्या गोष्टी घडतच असतात. दोन्ही देशामध्ये क्रमाने-सामने होणारे हल्ले सध्या एक साधी गोष्ट बनली आहे. एका महिन्यामध्ये दोन तीन वेळा तर हे हल्ले होतच राहतात. अनेकदा भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांनी चिनी सैनिकांना दूर राहायला सांगितले असून देखील ते भारतीय सीमांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयन्त करतात.

Indian Air Force exercise भारत-चीन संघर्षादरम्यान आजपासून लढाऊ विमानांची LAC वर गर्जना, हवाई दलाचा युद्धाभ्यास सुरु

Latest Posts

Don't Miss