spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रित्झकर आर्किटेक्चर पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय बाळकृष्ण दोशी यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

पीएम मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'डॉ बीव्ही दोशीजी एक उत्कृष्ट वास्तुविशारद आणि एक उल्लेखनीय संस्था निर्माते होते.

प्रसिद्ध वास्तुविशारद आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते बाळकृष्ण दोशी यांचे मंगळवारी अहमदाबादमध्ये निधन झाले. वारले तेव्हा ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी ट्विट करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. त्याचवेळी, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आर्किटेक्ट दोशी यांचे वास्तुशास्त्राच्या जगाचा ध्रुव तारा असल्याचे वर्णन करून शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘डॉ बीव्ही दोशीजी एक उत्कृष्ट वास्तुविशारद आणि एक उल्लेखनीय संस्था निर्माते होते. पुढील पिढ्यांना त्यांच्या महानतेची झलक भारतभरातील त्यांच्या समृद्ध कार्यातून मिळेल. त्यांचे निधन दुःखद आहे. ओम शांती.’

भूपेंद्र पटेल यांनी व्यक्त केले दुःख

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजराती भाषेत ट्विट करून दोशी यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या ट्विटमध्ये सीएम पटेल म्हणाले की, प्रित्झकर पारितोषिक विजेते ‘पद्मभूषण’ बाळकृष्ण दोशीजी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो, जगप्रसिद्ध वास्तुविशारद जे वास्तुशास्त्राच्या जगात एका ध्रुव ताऱ्यासारखे आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना, असंख्य चाहत्यांना आणि शिष्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

कोण होते बाळकृष्ण दोशी?

दोशी यांनी मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घेतले आणि १९५० च्या दशकात पॅरिसमध्ये दिग्गज वास्तुविशारद ली कॉर्बुझियर यांच्यासोबत काम केले. त्यानंतर भारतातील प्रकल्प हाताळण्यासाठी ते देशात परतले. १९५६ मध्ये त्यांनी वास्तुशिल्प या स्टुडिओची स्थापना केली. त्यांनी साकारलेल्या प्रोजेक्ट्समध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंडॉलॉजी, सीईपीटी विद्यापीठ आणि अहमदाबादमधील कनोरिया सेंटर फॉर आर्ट्स, बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि इंदूरमधील कमी ते मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी बांधण्यात आलेल्या अरण्य या टाऊनशिपचा देखील यात समावेश आहे.अरण्य लो कॉस्ट हाऊसिंगसाठी त्यांना १९९१५ मध्ये आर्किटेक्चरसाठी प्रतिष्ठित आगा खान पुरस्कार मिळाला.

२०१८ मध्ये त्यांना प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार मिळाला, जो वास्तुकला क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय वास्तुविशारद होते. याशिवाय, २०२० मध्ये त्यांना पद्मभूषण, भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. २०२२ मध्ये त्यांना रॉयल इंस्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सकडून ‘रॉयल ​​गोल्ड मेडल’ मिळाले.

हे ही वाचा:

Kangana Ranaut ती परत आली आहे, कंगनाने केले ट्विटरवर आगमन, ट्विट करून म्हणाली

shubhvivah शुभविवाह मालिकेतील कलाकारांचे झाले कौतुक, जीव धोक्यात घालून पूर्ण केले शूट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss