Bank Holidays 2024 : सप्टेंबर महिन्यात राहतील इतके दिवस बँका बंद; जाणून घ्या सुट्ट्यांची यादी….

Bank Holidays 2024 : सप्टेंबर महिन्यात राहतील इतके दिवस बँका बंद; जाणून घ्या सुट्ट्यांची यादी….

काहीच दिवसात ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना चालू होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) २०२४ च्या कॅलेंडर नुसार सप्टेंबर महिन्यातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. देशाच्या विविध भागांतील खाजगी आणि सार्वजनिक (Private and Public)क्षेत्रातील बँका सप्टेंबरमध्ये एकूण १५ दिवस बंद राहतील. त्यामध्ये दुसरा व चौथा शनिवार आणि इतर रविवार यांचाही समावेश आहे. परंतु या सुट्ट्या या प्रादेशिक भागानुसार जाहीर केल्या गेल्या आहेत. कारण प्रत्येक भागानुसार राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्यांमध्ये फरक आढळून येतो. प्रत्येक राज्यात बँकांच्या सुट्ट्या बदलतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) अधिकृत संकेतस्थळावर प्रत्येक राज्यानुसार विविध राज्यांचे सण आणि सुट्टीचे तपशीलवार यादी जाहीर केली आहे. बँका बंद असल्या तरीही तुमची ऑनलाईन पद्धतीने कामे तुम्ही सहज करू शकता.

सप्टेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्यांची यादी:
१ सप्टेंबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी
४ सप्टेंबर: श्रीमंत शंकरदेवाची तिरुभव तिथी (गुवाहाटी)
७ सप्टेंबर: गणेश चतुर्थी (संपूर्ण भारत)
८ सप्टेंबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी
१४ सप्टेंबर: दुसरा शनिवार, पहिला ओणम (कोची, रांची, तिरुवनंतपुरम)
१५ सप्टेंबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी
१६ सप्टेंबर: बारावाफट (जवळजवळ संपूर्ण भारत)
१७ सप्टेंबर: मिलाद-उन-नबी (गंगटोक, रायपूर)
१८ सप्टेंबर: पंग-लाहबसोल (गंगटोक)
२० सप्टेंबर: ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू, श्रीनगर)
२१ सप्टेंबर: श्री नारायण गुरु समाधी दिवस (कोची, तिरुवनंतपुरम)
२२ सप्टेंबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी
२३ सप्टेंबर: महाराजा हरिसिंह यांचा जन्मदिन (जम्मू, श्रीनगर)
२८ सप्टेंबर: चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
२९ सप्टेंबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी

बँका बंद असतील तरीही नागरिकांना काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही बँकांची कामे डिजिटल (Digital), ऑनलाईन (Online) पद्धतीने घरबसल्या करू शकणार आहेत.

हे ही वाचा:

“विकृत मानसिकता सत्ताधाऱ्यांमुळे होत असेल तर ही शोकांतिका”; Praniti Shinde यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य, महाराष्ट्र निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्री चेहरा कोण असेल?, म्हणाले…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version