Sunday, June 30, 2024

Latest Posts

जुलै महिन्यात इतक्या दिवस बँका राहणार बंद ; RBI ने केली जाहीर बँकांच्या सुट्ट्यांची यादी

जुलैमधील १२ दिवसांच्या बँक सुट्टीच्या यादीत दुसरा शनिवार, चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. ही राज्यनिहाय बैंक सुट्टीची यादी तुम्ही पाहू शकतात.

बँकेमध्ये नियमित पैश्याचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. RBI ने जुलै महिन्यातील सुट्ट्यांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीनुसार जुलै महिन्यामध्ये देशभरातील बँका एकूण १२ दिवस बंद राहणार आहेत. देशातील बँकांची मुख्य बँक असलेल्या रिझाई बैंक ऑफ इंडियाने (RBI) जुलै महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पुढील महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्यांव्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये स्थानिक सणामुळे बँकांना सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व बँक ग्राहकांच्या सोयीसाठी राष्ट्रीय स्तरावर एक महत्वपूर्ण यादी प्रसिद्ध करत असते. त्यामुळे आता पुढील महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही महत्वाचे काम असल्यास, ही यादी पाहूनच कामाचे नियोजन करा. यामुळे तुम्हाला कोणत्याच प्रकारची समस्या उद्भवणार नाही.

आठवड्यातून एक दिवस सुट्टी असण्याव्यतिरिक्त, बँका दुसऱ्या शनिवार आणि चौथ्या शनिवार बंद राहतात. या शिवाय बँकांना काही खास प्रसंगी सुट्ट्या असतात. जुलैमधील १२ दिवसांच्या बँक सुट्टीच्या यादीत दुसरा शनिवार, चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. ही राज्यनिहाय बैंक सुट्टीची यादी तुम्ही पाहू शकतात.

  • ३ जुलै २०२४ : शिलाँगमध्ये (Shilong) बँका बेह दीनखलम सणानिमित्त बंद राहतील
  • ६ जुलै २०२४ : एमएचआयपी (MHIP) दिनानिमित्त आयझॉलमध्ये बँका बंद राहतील
  • ७ जुलै २०२४ : रविवार असल्यामुळे देशभरात बँका बंद राहतील.
  • ८ जुलै २०२४ : कांग रथयात्रेनिमित्त इंफाळमध्ये बँका बंद राहतील
  • ९ जुले २०२४ : द्रुकपा-त्से-जीनिमित्त गंगाटोकमधील बँकाना सुट्टी असेल.
  • १३ जुलै २०२४ : दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
  • १४ जुलै २०२४ : रविवार असल्याने देशभरातील चुक्न बंद राहतील
  • १६ जुलै २०२४ : हरेलाच्या निमित्ताने डेहराडूनमधील बँकाना सुट्टी असेल.
  • १७ जुलै २०२४ : मोहरमच्या निमित्ताने अहमदाबाद, भुवनेश्वर, चंदीगड, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, इटानगर, कोची, आणि त्रिवेंद्रम वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील
  • २१ जुलै २०२४ : रविवार असल्यामुळे देशभरातील बँका बंद राहतील.
  • २७ जुलै २०२४ : चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँकेला सुट्टी असेल.
  • २८ जुलै २०२४ : रविवार असल्याने देशभरात बँका बंद राहतील

सुट्टीच्या काळात ग्राहकांना ऑनलाइन (online) सेवांचा आधार मिळणार आहे. बँका ही एक महत्त्वाची वित्तीय संस्था (Financial Institution) आहे. अशा स्थितीत बँकांना दीर्घकाळ सुट्ट्यांमुळे ग्राहकांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, सध्या बदलत्या काळानुसार ऑनलाइन बँकिंग आणि मोबाइल बँकिंगमुळे बँकेसंदर्भातील कामे करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे आता सुट्टीकाळात मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग (Net Banking) सुविधेचा ग्राहकांना आधार असणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. युपीआय सेवा बँकेच्या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. यासोबतच खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला एटीएम देखील पर्याय असणार आहे. याशिवाय तुम्ही या सुट्ट्यांची यादी RBI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. त्यामुळे बँकेशी संबंधित कामे करण्यासाठी वेळीच वेळापत्रक ठरवून घेणे गरजेचे ठरणार आहे.

हे ही वाचा :

T20 WORLD CUP : PANDYA आणि NATASAचा व्हिडीओ कॉलवर संवाद ; नात्यात सर्वकाही अलबेल

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss