Anant- Radhika यांच्या लग्नाआधी गृहशांती पूजेचे कार्य पडले पार ; Viren Merchant झाले भावुक

Anant- Radhika यांच्या लग्नाआधी गृहशांती पूजेचे कार्य पडले पार ; Viren Merchant झाले भावुक

गेले काही दिवसांपासून राधिका मर्चंड आणि अनंत अंबानी यांच्या विवाहाच्या अनेक रीतिरिवाज पार पडत आहेत. त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम हा मोठ्या दिमाखात सुरु आहे. ते दोघे आज म्हणजे १२ जुलै २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.साऱ्या जगाचे लक्ष या भव्यदिव्य विवाहसोहळ्याकडे लागले आहे. या मोठ्या लग्नासाठी देशाविदेशातले दिग्गज मुंबईत दाखल होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनंत राधिकाच्या लग्नाचे प्री वेडिंग फंक्शन सुरु होते. अखेर आज त्यांचे लग्न पार पडणार आहे.

अनंत आणि राधिका यांनी नुकतीच आपापल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत गृहशांती पूजा केली. या पूजेच्या अनेक व्हिडिओंनी सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. एका व्हिडिओमध्ये अंबानी त्यांच्या गृहशांती पूजेच्या ठिकाणी पोहोचताना दिसत आहेत. व्हिडिओत अनंत अंबानींना पाहून राधिका मर्चंट क्यूट एक्सप्रेशन देताना दिसतेय. यावेळी तिने क्रीम आणि सोनेरी रंगाची साडी नेसलेली. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. अशा अनेक गोष्टी या व्हिडिओमध्ये दिसल्या ज्या लक्ष वेधून घेत आहेत.

लाल आणि सोनेरी कपड्यांमध्ये अनंत अंबानी ही हसमुख राहुन सगळीकडे वावरताना दिसतोय. राधिका मर्चंटची आई शैला मर्चंट यांनी पूजेची थाळी हातात घेऊन आपल्या होणाऱ्या जावयाचे स्वागत केले. या सोहळ्यासाठी राधिका फार सुंदर नटलेली.व्हिडिओमध्ये राधिका मर्चंट अनंत अंबानींच्या गळ्यात फुलांचा हार घालताना पाहायला मिळते. त्यानंतर राधिकाने तिचे वडील वीरेन मर्चंट यांना मिठी मारली. त्या क्षणी ते भावूक झालेले पाहायला मिळाले. यानंतर राधिका अनंतने मिठी मारली. एकमेकांना मिठी मारताना हे कपल खूपच क्यूट दिसत होते. बाप कितीही मोठा उद्योगपती असला तरी लेकीची पाठवणी करताना तो खूपच हतबल होतो हे दृष्य या व्हिडिओमधून पाहायला मिळाले.

राधिका यांनी सासू सासऱ्यांसोबत केली पूजा :

राधिकाने अनंतचे वडील मुकेश अंबानी यांनाही मिठी मारली. राधिकाने आपल्या होणाऱ्या सासूबाई नीता अंबानी यांच्यासोबत एका विधीत सहभागही घेतला आणि नंतर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्यापुढे नतमस्तक झाली. अंबानी कुटुंबाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य लग्नाच्या तीन दिवस आधी ९ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये गृहशांती पूजेचे आयोजन केले होते. त्यांच्या लग्नानंतर त्यांचा आशीर्वाद सोहळा आणि त्यानंतर ‘मंगल उत्सव’ म्हणजेच रिसेप्शन पार पडेल.

हे ही वाचा:

SUDHIR MUNGANTIVAR यांनी विरोधकांना दिला ‘वाघनखांच्या करारावर’ करारी जवाब..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version