spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त द्या हटके शुभेच्छा..

श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाची जयंती जन्माष्टमी उत्सव म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाची जयंती जन्माष्टमी उत्सव म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रीकृष्णाच्या लीला, नीती, धोरणे, मुसद्देगिरी, कथा यानिमित्ताने पुन्हा आळवल्या जातात. श्रीकृष्णांची शिकवण आचरणात आणण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करण्याचा संकल्प केला जातो. श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त द्या हटके शुभेच्छा…

जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा…!

नंद किशोरा , चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे
कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!

ही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपू्र्वक शुभेच्छा…!

“गाणी म्हणू या जागरण करू या
प्रसाद ठेवूनी स्मरण तयांचे गोड मानूया
पून्हा नव्याने उत्साह साजरा करूया
दहीहंडी फोडू या गोपाळकाला खाऊ या
जन्माष्टमीला निमीत्त करूनी कान्हाचे
आठवणी आपण रंगवूया…
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा”

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपींचा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमीचा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

जन्माष्टमीच्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
शुभ जन्माष्टमी.

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
।।गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।।

अश्या हटके शुभेच्छा द्या आणि गोकुळाष्टमीचा सण साजरा करा

हे ही वाचा :-

जन्माष्टमीला घरी दही लावताय ? मग या गोष्टी नक्की जाणून घ्या

कृष्ण जन्माष्टमी विशेष, जाणून घ्या श्रीकृष्ण देवाची जन्मकथा

Latest Posts

Don't Miss