सावधान! कोरोनाचा धोक्का वाढला, चीनमधल्या BF.7 व्हेरिएंटची भारतात एन्ट्री

सावधान! कोरोनाचा धोक्का वाढला, चीनमधल्या BF.7 व्हेरिएंटची भारतात एन्ट्री

omicron News:  चीनमधील (China) कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे भारतासह जगभरात चिंतेचे वातावरण आहे. चीनमध्ये, हे ओमिक्रॉनचे (Omicron) सब-व्हेरियंट BF7 खूप वेगाने पसरत आहे, यामुळे येत्या काही दिवसांत १.५ दशलक्षाहून अधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे.

भारतात आतापर्यंत BF.7 चे दोन रूग्ण गुजरातमध्ये (Gujarat) तर एक रूग्ण ओडिशात नोंदवला गेला आहे. यूएस (US), यूके (UK) आणि बेल्जियम (Belgium), जर्मनी, फ्रान्स (France) आणि डेन्मार्क (Denmark) सारख्या युरोपियन देशांसह इतर अनेक देशांमध्ये या व्हेरिएंटचे रूग्ण आधीच आढळून आले आहेत. दरम्यान, बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड आढावा बैठकीत कोविड रूग्णांमध्ये आतापर्यंत वाढ झालेली नसली तरी, नव्या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या बैठकीनंतर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी नागरिकांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोके वर काढल्याच्या वृत्तानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी बुधवारी देशातील कोरोनाच्या मुद्द्यावर अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेतली. यानंतर संबंधित विभाग आणि संस्थांना सतर्क करण्यात आले आहे. त्यांना दक्षता घेण्यास सांगितले आहे. दरम्यान, भारतातील कोरोना स्थितीबाबत बोलताना आदर पुनावाला यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. पुनावाला म्हणाले, की ‘भारतात उत्कृष्ट व्हॅक्स कव्हरेज आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही’. मात्र याचवेळी महाराष्ट्र अलर्टवर असल्याने राज्यातील नागरिकांना मात्र विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

हे ही वाचा:

उद्या असणार वर्षातील सर्वात लहान दिवस, जाणून घ्या या मागचा रंजक वैज्ञानिक दृष्टिकोन

देशाचे राष्ट्रपिता एकच आहेत आणि ते म्हणजे महात्मा गांधी, अमृता फडणवीसांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version