Bhagwan Vishwakarma Pooja : भगवान विश्वकर्मा कोण आहेत? जाणून घ्या त्यांचे पूजन का केलं जाते

Bhagwan Vishwakarma Pooja : भगवान विश्वकर्मा कोण आहेत? जाणून घ्या त्यांचे पूजन का केलं जाते

विश्वकर्मा पूजा हा एक सण आहे. जेथे कारागीर, शिल्पकार, श्रमिक हे भगवान विश्वकर्माचा उत्सव साजरा करतात. मान्यतेनुसार ब्रह्मदेव ज्यावेळी सृष्टीची निर्मिती करत होते त्यावेळी भगवान विश्वकर्मा यांनी त्यांना मदत केली. भगवान विश्वकर्मा यांना देवतांच्या महलांचे वास्तू शिल्पकार देखील म्हटले जाते. यामुळेच भगवान विश्वकर्मा हे जगातील पहिले अभियंता आणि वास्तू विशारद मानले जातात. विश्व, संसार किंवा ब्रह्मांड आणि कर्म निर्माता या दोन शब्दांपासून विश्वकर्मा शब्द बनला. यामुळेच विश्वकर्मा या शब्दाचा अर्थ जगाचा निर्माता असा होतो.

विष्णू पुराणानुसार भगवान विश्वकर्मा हे देवतांचे लाकूडकाम करणारे मानले जातात. पुराणात त्यांच्यासाठी वर्धकी म्हणजे लाकूडकाम अशा शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे. वास्तूदेवाचा विवाह अंगिरसी नावाच्या कन्येसोबत झाला होता. त्या दोघांपासून भगवान विश्वकर्मा यांचा जन्म झाला. वास्तूदेव ब्रह्मा यांचे पूत्र धर्मपुत्र आहे. ब्रह्मदेवाने भगवान विश्वकर्मा यांची विश्वाचे शिल्पकार म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी स्वर्ग लोक, इंद्रपुरी, द्वारिका नगरी, सोन्याची लंका, सुदामापुरी अशा अनेक नगरांची आणि ठिकाणांची निर्मिती केली. भगवान विश्वकर्मा यांनी यमराजाचे कालदंड, भगवान विष्णूचे सुदर्शन चक्र, भगवान शंकराचे त्रिशूल, पुष्पक विमान याच्यासह अनेक शस्त्र आणि उपकरणांची निर्मिती केली.

हेही वाचा : 

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरून प्रवास करायचा? घ्या जाणून टोलची रक्कम…

देव शिल्पी भगवान विश्वकर्मा यांची दरवर्षी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी १७ सप्टेंबर रोजी पूजा केली जाते. योगायोगाने, यावर्षी विश्वकर्मा जयंती कन्या संक्रांतीच्या दिवशी १७ सप्टेंबर रोजी आहे. अशा स्थितीत यंदा विश्वकर्मा पूजनासह सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत फलदायी ठरेल कारण सूर्यदेव हे भगवान विश्वकर्मा यांचे जावई असून भगवान विश्वकर्मा यांनी सूर्यदेवाच्या किरणांना आकार दिला आहे.

भगवान विश्वकर्मा यांचे पूजन

सर्व प्रथम अक्षत म्हणजे तांदूळ, फुले, मिठाई, फळांची रोळी, सुपारी, धूप, दिवा, रक्षासूत्र, पूजेचे पद, दही आणि भगवान विश्वकर्माचे चित्र लावावे. पूजेच्या वेळी तांदळाच्या पिठाने अष्टदल रांगोळी काढावी. त्याच्या वर ७ प्रकारचे धान्य ठेवा. त्यावर भगवान विश्वकर्माची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. हातात अक्षत घ्या आणि ओम भगवान विश्वकर्मा देव शिल्पी इहगच्छ इह सुप्रसिष्ठो भव म्हणा.

“गद्दारांनी केलं ते योग्य होतं का?” सेनेच्या निष्ठा यंत्रातून आदित्य ठाकरेंचा जनतेला सवाल

त्यानंतर तांदळाच्यावर मूर्ती किंवा चित्र, काहीही असो, ठेवा. मग भगवान विश्वकर्मा तुमच्या समोर आहेत असा विश्वास मनात जागृत करून त्यांना नमस्कार करून मग पूजा करावी. अवजारांवर हळद कुंकू व अक्षत लावून मग फुले अर्पण करावीत. भगवान विश्वकर्मा यांची मूर्ती आणि चित्रासोबत कलश ठेवा. यानंतर कलशावर रोली-अक्षत लावा, त्यानंतर ओम पृथ्वीय नमः, ओम अनंतम नमः, ओम कुमाय नमः, ओम श्री सृष्टनाय सर्वसिद्धाय विश्वकर्माय नमो नमः या मंत्राचा उच्चार करून दोन्ही अक्षत हातात घेऊन सर्व यंत्रांवर शिंपडा. विश्वकर्मा आणि चारी बाजूंनी कलशावर पुष्प अर्पण करा. भगवान विश्वकर्माला मिठाई अर्पण करा. यानंतर भगवान विश्वकर्माची आरती करून प्रसाद वाटप करावा.

PM Modi Birthday : ‘५६ इंच’ थाळी संपवा आणि जिंका ‘साडे आठ लाख’ रुपयांचं बक्षीस

Exit mobile version