spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bharat Ratna Lal krishna Advani : अयोध्येसाठी रथयात्रा काढून आडवाणींनी राजकारणात केली होती उलथापालथ, जाणून घ्या सविस्तर

राम मंदिर आंदोलनाचे नेते म्हणून आडवाणी यांची ओळख आहे. त्यांनी १९९० च्या दशकात राम मंदिरासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. या रथयात्रेमुळे राजकारणात मोठा बदल हा झाला होता.

आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट नुकतीच समोर आली आहे. लालकृष्ण आडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न (Bharat Ratna to LK Advani) जाहीर करण्यात आला आहे. खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी स्वतः ट्विट करत या संदर्भाची बातमी ही दिली आहे. तसेच लालकृष्ण आडवाणी यांचे फोन करुन अभिनंदन केले आहे. तसेच राम मंदिर आंदोलनाचे नेते म्हणून आडवाणी यांची ओळख आहे. त्यांनी १९९० च्या दशकात राम मंदिरासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. या रथयात्रेमुळे राजकारणात मोठा बदल हा झाला होता.

आडवाणीं यांच्या राम रथयात्रेमुळे उत्तर प्रदेशचे राजकीय चित्र हे पूर्ण बदलून गेले होते. ५ सप्टेंबर १९९० रोजी अडवाणींच्या नेतृत्वाखाली गुजरातमधील सोमनाथ ते उत्तर प्रदेशातील अयोध्या यात्रेला सुरुवात झाली. तिचे नाव होते – राम रथयात्रा. रथयात्रा सुरू केल्यानंतर अडवाणींनी भाषण दिले आणि त्यात ते म्हणाले – आम्ही रामाची शपथ घेतो, आम्ही तिथे मंदिर बांधू. या रथयात्रेत अडवाणींसोबत नरेंद्र मोदीही होते.

लालकृष्ण अडवाणी यांना समस्तीपूर येथे अटक करण्यात आली. आणि त्यांना दुमका (आता झारखंड) येथे नजरकैदेत ठेवण्यात आले. ३० ऑक्टोबर १९९२ रोजी अयोध्येत रथयात्रेची सांगता होणार होती. त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली होती. राम रथयात्रेचा परिणाम असा झाला की, एकीकडे देशात मंडल राजकारण खेळले जात असताना दुसरीकडे यूपीमध्ये संपूर्ण राजकारण मंडल विरुद्ध कमंडल असे झाले. यानंतर यूपीच्या राजकारणात उलथापालथ झाल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने १९९१ मध्ये माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या नेतृत्वाखाली यूपीमध्ये पहिल्यांदा सरकार स्थापन केले. मात्र, ६ डिसेंबर १९९२ रोजी सरकार पडले.

यानंतर कल्याण सिंह १९९७ मध्ये, राम प्रकाश गुप्ता १९९९ मध्ये आणि राजनाथ सिंह २००० मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २०१७ हे वर्ष आले जेव्हा भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमताने सत्ता मिळवली आणि योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले. २०१७ पूर्वी यूपीतील भाजपचे सरकार डगमगले असेल, पण राम मंदिराचा मुद्दा पक्षाने कधीच सोडला नाही. पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यापासून ते नेत्यांच्या वक्तव्यापर्यंत राम मंदिराचा उल्लेख होता.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss