काश्मीरमध्ये राहणाऱ्या स्थानिक दहशतवाद्यांवर मोठी कारवाई

राजौरी येथे एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये (Kashmir ) आश्रय घेणाऱ्या सर्व स्थानिक दहशतवाद्यांवर (Terrorists) मोठी कारवाई सुरु करण्यात आली आहे.

काश्मीरमध्ये राहणाऱ्या स्थानिक दहशतवाद्यांवर मोठी कारवाई

राजौरी येथे एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये (Kashmir ) आश्रय घेणाऱ्या सर्व स्थानिक दहशतवाद्यांवर (Terrorists) मोठी कारवाई सुरु करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरचे (Jammu and Kashmir) मूळ रहिवासी असलेल्या मात्र, आश्रय घेण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेलेल्या सर्व दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राजौरी इथं आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत सिंग बोलत होते. पोलिसांकडे जम्मू-काश्मीरच्या विविध भागात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची यादी असल्याचे सिंग म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलेल्यांची मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया सुरूच राहणार असल्याची माहितीदिलबाग सिंग यांनी दिली. या दहशतवाद्यांवर बारीक नजर ठेवली जात आहे. कारण ते नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलीकडे बसून दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत. त्या दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवली जाणार नाही, असे सिंगम्हणाले. जर त्यांनी परत येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मारले जाईल असेही ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांमागे हे लोक असल्याचे सिंग म्हणाले. नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत. ग्राम संरक्षण समित्या (VDCs) दहशतवादविरोधी कारवायांमध्ये मोठी भूमिका बजावत आहेत. घुसखोरीचे सर्व मोठे प्रयत्न हाणून पाडण्यात आले असल्याचे सिंग म्हणाले. सीमा ग्रिड आणखी मजबूत करण्यासाठी नियंत्रण रेषेजवळ काही ठिकाणी लष्करासह पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेसह इतर सुरक्षा यंत्रणा दहशतवादी संघटनांचा निधी रोखण्यासाठी त्यांच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य करत आहेत. पीओकेमध्ये दहशतवादी बनण्यासाठी आलेल्या जम्मू-काश्मीरमधील मूळ रहिवाशांची मालमत्ता जप्त करणे हा या नव्या हालचालीचा भाग म्हणून पाहिले जात आहे. दहशतवादी कुलगाम-शोपियन जिल्ह्यांमधून ते जम्मू विभागातील राजौरी-पुंछ जिल्ह्यांकडे जात आहेत. यातील तिघांचा मृत्यू झाला असून इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती दिलबाग सिंग यांनी दिली. डोंगरावरुन घसरलेला एक दहशतवादी रियासी येथे मृतावस्थेत आढळून आला आहे. तर राजौरी चकमकीत आणखी एक जण ठार झाला असून, तिसरा रियासी चकमकीत मारला गेला आहे.

हे ही वाचा: 

जी – २० परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज भारतात होणार दाखल

शिवरायांची वाघनखं यावर्षीच मायभूमीत परतणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version