spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Savarkar Karnataka Assembly सावरकरांच्या फोटोवरून कर्नाटक विधानसभेत मोठा गोंधळ, काँग्रेस भडकली

विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या फोटोवरून कर्नाटक विधानसभेत गदारोळ झाला. विधानसभेच्या सभागृहात सावरकरांचा फोटो लावण्यास काँग्रेस (Congress) आमदारांनी आक्षेप घेत गदारोळ केला. सावरकर हे वादग्रस्त व्यक्तिमत्व होते, त्यांचे चित्र लावू नये, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. विधानसभेच्या सभागृहात सावरकरांचा फोटो लावण्यात आल्याचे वृत्त समजताच काँग्रेसचे आमदार संतप्त झाले आणि त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यासह इतर महापुरुषांची छायाचित्रे हातात धरून निषेध करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : 

IPL 2023 Auction IPL लिलाव 23 डिसेंबरला होणार, जाणून घ्या ‘या’ बड्या खेळाडूंची मूळ किंमत

कर्नाटकमध्ये २०२३ (Savarkar Karnataka Assembly) साली येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीआधी सावरकरांसंदर्भात सुरु असलेल्या वादांच्या यादीमध्ये या वादामुळे नव्याने भर पडली आहे. राज्यभरामध्ये सावरकरांच्या कार्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने भाजपाने मोहीम हाती घेतली आहे. त्याचअंतर्गत बेळगावमध्येही जागृती केली आणि म्हणूनच हा फोटो लावण्यात आल्याचं भाजपा नेत्यांनी सांगितल्याचा उल्लेख एनडीटीव्हीच्या वृत्तामध्ये आहे.

FIFA World Cup 2022 अर्जेंटिनाच्या दमदार कामगिरीच्या मागे ‘हे’ पेय आहे का? मेस्सीचा फोटो होतोय व्हायरल

विधानसभेत महात्मा गांधी, बसवन्ना, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल आणि स्वामी विवेकानंद यांचेही फोटो लावण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. काँग्रेसच्या आधीच्या नेत्यांनाही सावरकरांची अडचण वाटत होती. सावरकरांच्या फोटोला विरोध करणं योग्य नाही. सावरकर देशभक्त होते. अंदमान निकोबारच्या जेलमध्ये त्यांनी बरीच वर्ष काढली. काँग्रेस नेते तुरुंगात एक दिवसही राहू शकत नाहीत. काँग्रेसने देशासाठी त्याग केला असं तुम्ही वारंवार म्हणताय. तुम्ही ज्या काँग्रेसबाबत म्हणताय ती काँग्रेस ही नाही. आजची काँग्रेस बोगस आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली. सावरकरांचा फोटो लावल्याने तुम्हाला दु:ख झालं. सिद्धरामैय्या यांना विचारा मग विधानसभेत दाऊद इब्राहिमचा फोटो लावायचा आहे का? काँग्रेस लांगूलचालन करण्याचं राजकारण करत असते. तीच त्यांची समस्या आहे. त्यामुळेच देशाची ही अवस्था झाली आहे, असा हल्लाबोलही जोशी यांनी केला.

मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले आहेत का?, नाना पटोले

Latest Posts

Don't Miss