Shraddha Murder Case : श्रद्धाच्या निर्घृण हत्येनंतर आरोपी आफताबची मोठी कबुली, ‘मृत्यूदेहाची १६ दिवस विल्हेवाट…’

Shraddha Murder Case : श्रद्धाच्या निर्घृण हत्येनंतर आरोपी आफताबची मोठी कबुली, ‘मृत्यूदेहाची १६ दिवस विल्हेवाट…’

श्रद्धा वालेकर या मुंबईतल्या तरुणीच्या दिल्लीत झालेल्या खून प्रकरणाने जगभरात खळबळ माजली आहे. तिचाच प्रियकर आफताब पुनावाला याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते जंगलात टाकले होते. या भीषण हत्याकांडाची कथा जो कोणी ऐकेल त्याच्या पायाखालची जमीन सरकते. या खूनाचा शोध तब्बल सहा महिन्यांना नंतर दिल्ली पोलिसांनी लावला. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना श्रद्धाच्या शरीराचे काही अवशेष सापडले आहेत. सध्या पोलीस हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घेत आहेत. विश्वासघात आणि फसवणुकीच्या या संतापजनक घटनेत आरोपी आफताब गुन्हा केल्यानंतर सहा महिने फरार होता. चौकशीत त्यानं पोलिसांना सांगितलं की, श्रद्धाचा खून केल्यानंतर तो त्याच घरात राहत होता. त्याच्या चौकशीत हत्येचा तपशील समोर आल्यानंतर शनिवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली.

हेही वाचा : 

“२०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार”; संजय राऊत

या हत्याकांडाविषयी आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. श्रद्धाला आपल्या जीवाला धोका असल्याची कुणकूण आधीच लागली होती आणि तिने याबद्दल आपल्या एका मित्राला मेसेज केल्याचंही आढळून आलं आहे. श्रद्धाचा मित्र लक्ष्मणने श्रद्धाबद्दल तिच्या कुटुंबाला सांगितलं होतं. श्रद्धाची सप्टेंबरपासून कोणालाही काहीही माहिती नव्हती. मात्र श्रद्धाने आपल्याला व्हॉटसपवरुन आपल्या अडचणी सांगितल्याचं लक्ष्मणने सांगितलं. तो म्हणाला, “एकदा श्रद्धाने मला व्हॉटसपवर मेसेद केला होता. त्या दोघांमध्ये सारखे वाद व्हायचे. त्यावेळी तिने माझी या घरातून सुटका कर, अशी विनंती मला केली होती. तसंच मी आज रात्री याच्याबरोबर थांबले तर तो मला मारुन टाकेल, असंही सांगितलं होतं.”

Happy Birthday Sania Mirza : यशाच्या शिखरांपासून ते वादांच्या खाच खळग्यांपर्यंत सर्व काही अनुभवलं

खूनाचा सुगावा कसा लागला?

८ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या मेहरौली पोलीस ठाण्यात श्रद्धाच्या वडिलांनी मुंबईत आपली मुलगी बेपत्ता झाल्याची एफआयआर दाखल केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. त्याने पोलिसांना सांगितले होते की, १४ सप्टेंबर रोजी श्रद्धाच्या मित्राने तिच्या मुलीशी संपर्क साधला होता. दोन महिन्यांहून अधिक काळ श्रद्धाचा फोन बंद होता. ज्या खोलीत गुन्हा घडला ती खोली आणि शरीराचे अवयव ठेवण्यासाठी वापरलेले रेफ्रिजरेटर या दोन्ही गोष्टी त्याने केमिकलने साफ केल्याचंही तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी फ्रिज जप्त केला तेव्हा त्यात रक्ताचा थेंबही नव्हता. ८ नोव्हेंबरला मुंबई पोलिसांनी श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार मेहरौली पोलीस ठाण्यात नोंदवली. तपासादरम्यान आफताबच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पाच दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गुवाहटी दौऱ्याची अखेर तारीख ठरली

Exit mobile version