spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रेल्वेचा मोठा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांना भाडेदरात मिळणारी सवलत केली जाणार रद्द…

कोविडच्या काळात भारतीय रेल्वेला झालेल्या तोट्यामुळे आता ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंना तिकीट दरात मिळणारी सवलत आता न देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.

कोविडच्या काळात भारतीय रेल्वेला झालेल्या तोट्यामुळे आता ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंना तिकीट दरात मिळणारी सवलत आता न देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. नागरिकांना तिकीट दरात दिली जाणारी सवलत आणि इतर सुविधा यामुळे रेल्वेला फार नुकसान होत असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. तिकिटांचा दर आधीच कमी असल्यामुळे आणि विविध श्रेण्यांमध्ये प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सवलतींमुळे रेल्वेला वारंवार तोटा सहन करावा लागला आहे, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले.

कोविड-19 साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावानंतर रेल्वे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि क्रीडा व्यक्तींसाठी असलेल्या सवलतींवरील बंदी मागे घेण्याचा विचार करत आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात रेल्वेमंत्र्यांनी ही माहिती दिली. प्रवासी सेवांसाठी कमी भाड्यांमुळं रेल्वेला आधीच ज्येष्ठ नागरिकांसह सर्व प्रवाशांसाठी सरासरी प्रवास खर्चाच्या 50 टक्के पेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे, असं वैष्णव म्हणाल्या. “याशिवाय, कोविड 19 मुळे, 2019-2020 च्या तुलनेत गेल्या दोन वर्षांतील रेल्वेची कमाई कमी आहे. याचा दीर्घकालीन परिणाम रेल्वेच्या आर्थिक आरोग्यावर होतो. सवलती देण्यामुळं रेल्वेवर खूप जास्त ताण येत आहे, त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांसह सर्व श्रेणीतील प्रवाशांसाठी सवलतींची व्याप्ती वाढवणं इष्ट नाही,” असं वैष्णव म्हणाल्या.

रेल्वेमंत्र्यांनी या वर्षी मार्चमध्ये लेखी उत्तरात लोकसभेत सवलती पुनर्स्थापित न करण्याचे नमूद केलं होतं. परंतु रेल्वेच्या वित्त आणि सेवांमध्ये सुधारणा झाल्यामुळं आणि कोविडची परिस्थिती सुधारल्यामुळं किमान ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती पुनर्संचयित केल्या जातील अशी अपेक्षा होती. दरम्यान रेल्वेनं अपंग व्यक्तींच्या चार श्रेणी, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या अकरा श्रेणींसाठी भाड्यात सवलत सुरू ठेवली आहे.

 

Latest Posts

Don't Miss