spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Cyrus Mistry: सायरस मिस्त्री प्रकरणात मोठी घडामोड; अनहिता पंडोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल

या वर्षी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झालेल्या अपघाताप्रकरणी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनाहिता पांडोळे यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला आहे. पालघर पोलिसांनी कारच्या डेटा चिपच्या विश्लेषणाच्या आधारे मर्सिडीज बेंझच्या अंतिम अहवालाच्या आधारे तसेच डॉ. पांडोले यांचे पती डॅरियस यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला नोंदवलेल्या निवेदनाच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला.

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (cyrus mistry) यांचा गुजरातहून मुंबईकडे कारने येत असताना पालघरमधील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर अनाहिता पंडोले आणि त्यांचे पती डेरियस पंडोले गंभीर जखमी झाले होते. अपघात झाला त्यावेळी मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनाहिता पंडोले या कार चालवत होत्या. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी गाडी चालवणाऱ्या अनहिता पंडोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा अपघात झाला तेव्हा सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले कारमध्ये मागच्या सीटवर बसले होते. तर, अनाहिता पंडोले आणि डेरियस पंडोले पुढे बसले होते. कार अनहिता पंडोले चालवत होत्या. या अपघातामध्ये मागच्या सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, पंडोले पती-पत्नी या अपघातात जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी माहिती देताना सांगितलं होतं, की मागे बसलेले मिस्त्री आणि जहांगीर पंडोले या दोघांनीही सीट बेल्ट लावलेला नव्हता. यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, मर्सिडीजने मुंबईपासून १२० किमी अंतरावर असलेल्या पालघरमधील चारोटी चेकपोस्ट पार केल्यानंतर नऊ मिनिटांत २० किमी अंतर कापलं होतं. म्हणजेच गाडीचा वेगही जास्त होता.

हे ही वाचा :

Bigg Boss Marathi 4: महेश मांजरेकर आज संपूर्ण आठवड्यातील स्पर्धकांची अक्कड उतरवणार

Janhvi Kapoor : ब्लू आऊटफिट मध्ये ‘जान्हवी कपूरचे’ बोल्ड फोटोशूट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss