पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये मोठा स्फोट! ५२ ठार तर १३० जखमी

बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ शुक्रवारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात एका पोलीस अधिकाऱ्यासह किमान 34 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहेत.

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये मोठा स्फोट! ५२ ठार तर १३० जखमी

पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील एका ठिकाणी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये पोलिसांचा देखील समावेश आहे. या घटनेत जवळपास १५२ जण जखमी झाले आहेत.

एसी मुनीम यांनी सांगितलं की, अलफलाह रोडवरील मदीना मशिदीजवळ ईद मिलादुन नबी (पीबीयूएच) जुलूससाठी लोक जमत असताना हा स्फोट झाला. त्यांनी पुष्टी केली की हा स्फोट डीएसपी गिश्कोरी यांच्या कारजवळ झाला. हा स्फोट ‘आत्मघाती स्फोट’ होता आणि हल्लेखोराने डीएसपी गिश्कोरी यांच्या कारजवळ स्वत:ला उडवलं अशी माहिती एसएचओ लेहरी यांनी दिली आहे. नबाब गौस बख्श रायसानी मेमोरिअल रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सईद मीरवानी यांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. सिटी स्टेशन हाऊस ऑफिशर मोहम्मद जावेद लेहरी यांनी या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. हा बॉम्बस्फोट आत्मघातकी हल्ला होता. डीएसपी गिशकोरी यांच्या कारजवळ हा स्फोट झाल्याचं ते म्हणाले. या घटनेत नवाज गिशकोरी यांचा देखील मृत्यू झाला आहे.

पीटीआयचे नेते इमरान इस्माईल यांनी या स्फोटाचा तीव्र शब्दात निषेध केला आणि म्हटलं की, ‘जे निष्पाप लोकांना मारतात ते अत्याचारी आणि दहशतवादी आहेत.’ कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणा लवकरच गुन्हेगारांना पकडतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या महिन्याच्या सुरुवातीला याच जिल्ह्यात जमीयत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) नेता हाफिज हमदुल्लासह किमान 11 जण स्फोटात जखमी झाले होते. आठवडाभरापूर्वी, एका लेवी अधिकाऱ्यावर बसस्थानकावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

बलुचिस्तानचे मंत्री जान अचकजई यांनी सांगितलं की, एक बचाव पथक मस्तुंगला पाठवण्यात आलं आहे. ते म्हणाले की, गंभीर जखमींना क्वेट्टा येथे हलविण्यात येत आहे. अचकजई म्हणाले, शत्रूला परकीय मदतीने बलुचिस्तानमधील धार्मिक सहिष्णुता आणि शांतता नष्ट करायची आहे, हा स्फोट असह्य आहे. कार्यवाहक मुख्यमंत्री अली मर्दन डोमकी यांनी स्फोटासाठी जबाबदार असलेल्यांना अटक करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाकिस्तानचे प्रभारी गृहमंत्री सरफराज अहमद बुगती यांनी या स्फोटात मृत्यू झालेल्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. दहशतवादाला कोणता धर्म किंवा आस्था नसते, असं ते म्हणाले.

हे ही वाचा: 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

अनंत चतुर्दशीचे महत्व, जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version