मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी महिलांना मोठी भेट, बँक खात्यात येणार ५००० रुपये… जाणून घ्या योजनेबाबत सविस्तर…

मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी  महिलांना मोठी भेट, बँक खात्यात येणार ५००० रुपये…  जाणून घ्या योजनेबाबत सविस्तर…

PM Narendra Modi 74 th Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ओडिशा सरकारने महिलांसाठी सुभद्रा योजना सुरु करणार. त्याचे औचित्य साधून महिलांसाठी एक नवीन योजना आणली आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात पाच हजार रुपये येणार आहे. सुभद्रा योजनेच्या पात्र महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जासाठी त्यांना सुभद्रा पोर्टलचा वापर करावा लागेल. तर ऑफलाईन अर्जासाठी ते स्थानिक बँक,पोस्ट ऑफिस आणि सामान्य सेवा केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी नोंदणी करू शकता.

तर पाहूया काय आहे योजना :
सुभद्रा योजना(Subhadra Yojna) ओडिशा सरकारची योजना आहे. या योजनेमध्ये राज्यातील २१ ते ६० वर्ष असलेल्या महिलाना दरवर्षी १०,००० रुपये त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे. मोहन चरण माझी ओडिशाचे मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या योजनेची सुरुवात केली.
योजनेला नाव भगवान जगन्नाथ यांची बहीण देवी सुभद्रा यांच्या नावावरून दिले आहे.

दोन टप्य्यात मिळणार १०,००० रुपये
राज्यातील महिलांच्या खात्यात ओडिशा सरकार दोन टप्य्यात १० हजार रुपये देणार आहेत. हि योजना पाच वर्षांसाठी म्हणजे २०२८-२९ पर्यंत असणार आहे. योजनेचा एक हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनी तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी दिला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ५५,८२५ कोटींच्या निधीची तरदूत केली आहे. या पैशांच्या माध्यमातून महिला आपला व्यवसाय सुरु करू शकतात.

कोणती कागदपत्रे लागतील –
आधारकार्ड – ओळख पडताळणीसाठी पासपोर्ट आकाराचा फोटो
जन्म प्रमाणपत्र – अर्जदाराच्या वयाची पुष्टी करण्यासाठी
बँक खाते तपशील – पैसे हस्तांतरित करण्यासाठी
पत्त्याचा पुरावा – ओडिशातील अर्जदाराच्या निवासस्थानाची पुष्टी करण्यासाठी
जात प्रमाणपत्र – लागू असल्यास,सामाजिक श्रेणीची तपशील प्रदान करण्यासाठी
रहिवासी पुरावा – ओडिशातील निवासाची पडताळणी करण्यासाठी मोबाईल नंबर आणि ई-मेल पत्ता

कोण ठरणार पात्र
महिला मूळाची ओडिशा राज्याचे रहिवाशी असावी.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA)किंवा राज्य अन्न सुरक्षा (SFSS)मध्ये महिलेचे नाव शिधापत्रिकेत असावे
एकूण कौंटुबिक उत्त्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराचे वय २१-६० वर्ष असावे.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version