Jio नेटवर्कची मोठी समस्या, अद्याप कंपनीकडून स्पष्टीकरण नाही

Jio नेटवर्कची मोठी समस्या, अद्याप कंपनीकडून स्पष्टीकरण नाही

जिओ (Jio) भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. आज सकाळपासून टेलिकॉम ऑपरेटर जिओला भारतात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक वापरकर्त्यांकडून सोशल मीडियावर तक्रार केली जात आहे की, सकाळपासून कॉल आणि एस एम एस करू शकत नाहीत. काही वापरकर्ते सकाळी उठल्यावर मॅसेज पाठवू शकले नाहीत. तसेच मोबाइल डेटा सेवा डाऊन असूनही सर्व वापरकर्त्यांसाठी सामान्यपणे कार्य करत असल्याचे दिसते. केवळ कॉलिंग आणि एसएमएस सेवा प्रभावित झाली आहे.

 

मागील काही काळापासून जिओच्या सेवांमध्ये तीन तासांच्या व्यत्ययामुळे बहुतेक Jio वापरकर्त्यांसाठी मोबाइल डेटा ठीक काम करत होता. फक्त कॉलिंग आणि एसएमएस सेवा बंद झाली होती. jio च्या संदर्भात तक्रार करण्यासाठी अनेक वापरकर्ते ट्विटरवर गेले. दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून वापरकर्त्यांनी समस्यांची तक्रार करण्यास सुरुवात झाली आणि ती सकाळी ९ वाजेपर्यंत चालली होती. जिओच्या सेवा खंडीत झाल्याचे एका वेबसाइटवर दाखवण्यात आले. Jio सेवा खंडित झाल्यामुळे शेकडो वापरकरर्ते या समस्येला सामोरे जात आहेत. तर याचा परिणाम मुंबई, दिल्ली आणि कोलकाता यासह सर्व प्रमुख शहरांमध्ये झाला. जिओचे अद्याप या समस्येवर कोणतेही अधिकृत विधान नाही, पण सेवा आता पुर्वव्रत झाल्या आहेत. व्यत्ययाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ट्विटरवर या समस्येच्या विरोधात JioDown ट्रेंड सुरु झाला आहे. या समस्येमुळे वापरकर्त्यांना खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एक वापरकर्त्याने ट्विट केले आहे की “संपर्क नसल्यामुळे त्यांची सकाळची फ्लाइट चुकली. आता याची भरपाई कोण देणार” असा सवाल त्याने ट्विटरवर विचारला आहे . सध्यातरी Jio च्या सेवा पुर्वव्रत सुरु झाल्या असल्या तरीही कंपनीने या संदर्भात कोणताही अधिकृत विधान केलेलं नाही.तसेच व्यत्ययाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. Jio ही भारतातील सर्वोत्तम दूरसंचार उद्योग (Telecommunication) असलेली कंपनी आहे.

गरम पाणी पिणे हे त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त

Exit mobile version