कस्टमची आजवरची सर्वात मोठी कारवाई

१३ जुनला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याचा आतापर्यंतची सर्वात मोठा साठा पकडण्यात आला होता. हे सोनं उझबेक नागरिक सोन्याच्या अलंकारांच्या स्वरुपात घेऊन आली होती. तीची झडती घेतल्यानंतर तिच्याकडून १६.५७० किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं.

कस्टमची आजवरची सर्वात मोठी कारवाई

१३ जुनला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याचा आतापर्यंतची सर्वात मोठा साठा पकडण्यात आला होता. हे सोनं उझबेक नागरिक सोन्याच्या अलंकारांच्या स्वरुपात घेऊन आली होती. तीची झडती घेतल्यानंतर तिच्याकडून १६.५७० किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत जवळपास ८.१६ कोटी इतकी सांगण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये आजी-नातीला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना या दोघींपैकी एकीला सहज पकडण्यात यश आलं. मात्र, दुसरीला पकडण्यामध्ये अधिकाऱ्यांना थोडी मेहनत घ्यावी लागली, कारण तिने विमानतळावर उतरताच रुप पालटून निघाली होती, पण तिला ग्रीन चॅनल ओलांडताना पकडण्यात आलं. तिची झडती घेताना तिची बॅग आणि कपड्यांमधून २६५ सोन्याच्या साखळ्या आमि ९ ब्रेसलेट मिळाले होते. त्यांचं एकूण वजन १६.५७० किलो इतकं आहे

कस्टम विभागाला दिल्ली विमानतळावर तस्करीच्या हेतून नेला जाणारा परदेशी चलनी नोटांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा सापडला आहे. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करताना ताजिकस्तानच्या ३ व्यक्तींकडून ७,२०,००० डॉलर आणि ४,६६,२०० रुपये जप्त केले आहेत.याची किंमत एकूण १० कोटी रुपये सांगण्यात येत आहे. सध्या तीनही तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाने नोटांचा हा साठा टर्मिनल ३ येथून जप्त केला कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे आरोपी जेव्हा इस्तंबुलच्या विमानात बसणार होते, तेव्हा त्यांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी यापुढे सांगितलं की, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ येथे ताजिकिस्तानच्या या ३ आरोपींना विदेशी चलनी नोटांसह अटक करण्यात आली.

भारतामध्ये सापडलेला विदेशी चलनी नोटांचा इतका साठा आधी केव्हाही सापडला नव्हता. एका वरीष्ठ सीमा शुल्क अधिकाऱ्याने सांगितलं की अटक केलेल्या तीघांमध्ये एका किशोरवयीन मुलाचाही समावेश आहे. या नोटा सामानाच्या आता ठेवलेल्या बुटांमध्ये लपवण्यात आली होती.मात्र, दुसरीला पकडण्यामध्ये अधिकाऱ्यांना थोडी मेहनत घ्यावी लागली, कारण तिने विमानतळावर उतरताच रुप पालटून निघाली होती, पण तिला ग्रीन चॅनल ओलांडताना पकडण्यात आलं. तिची झडती घेताना तिची बॅग आणि कपड्यांमधून २६५ सोन्याच्या साखळ्या आमि ९ ब्रेसलेट मिळाले होते. त्यांचं एकूण वजन १६.५७० किलो इतकं आहे

हे ही वाचा:

यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात अडकले तब्ब्ल ४५ जण, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Osmanabad Suicide Case, एका तरुणीने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत घेतला गळफास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version