spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Billionaires list जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा फेरबदल, गौतम अदानी घसरले सातव्या क्रमांकावर

शेअर्सच्या जोरदार घसरणीचा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नेटवर्थवरही वाईट परिणाम झाला आहे.

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल (Hindenburg Report) अदानी समूहाला भारी पडला आहे. हा अहवाल प्रकाशित झाल्यापासून, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांच्या (Adani Stocks) शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. शेअर्सच्या जोरदार घसरणीचा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नेटवर्थवरही वाईट परिणाम झाला आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्समध्ये सध्या चौथ्या स्थानावर असलेले गौतम अदानी अचानक सातव्या क्रमांकावर घसरले आहेत (Gautam Adani 7th Richest Person).

गेल्या वर्षी २०२२ मध्ये जगातील टॉप-१० अब्जाधीशांमध्ये गौतम अदानी हे सर्वाधिक कमाई करणारे उद्योगपती होते. २०२२ मध्ये या यादीतील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवण्यात ते यशस्वी ठरले होते, पण २०२३ हे वर्ष भारतीय गौतम अदानींसाठी अत्यंत वाईट ठरत आहे. वर्षाच्या सुरुवातीला सर्व काही ठीक होते, परंतु २४ जानेवारीला अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल आला आणि अदानी समूहाचे नुकसान होऊ लागले. अदानी समूहाचे मार्केट कॅप अवघ्या दोन दिवसांत २.३७ लाख कोटी रुपयांनी घटले. यामुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्तीही $१००.४ अब्ज इतकी कमी झाली आहे.

शीर्ष अब्जाधीशांच्या यादीतील बदलानुसार, फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट हे टॉप-१० मध्ये पहिल्या क्रमांकावर $२१५ अब्ज संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती ते ठरले आहेत. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क १७०.१ अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ऍमेझॉनचे सह-संस्थापक जेफ बेझोस हे $१२२.४ अब्ज संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अब्जाधीश लॅरी एलिसनला गौतम अदानी यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीचा सर्वाधिक फायदा झाला आणि ते चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. $९३२ दशलक्ष संपत्तीच्या वाढीसह, त्याची एकूण संपत्ती $११२.८ अब्ज इतकी वाढली, ज्यामुळे एलिसन जगातील चौथा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे $ १०७.८ अब्ज संपत्तीसह यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत आणि बिल गेट्स $ १०४.१ अब्ज संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहेत.

यादीत समाविष्ट असलेल्या इतर नावांबद्दल बोलायचे तर, कार्लोस स्लिम आणि कुटुंब $ ९३अब्ज संपत्तीसह आठव्या क्रमांकावर आहेत आणि लॅरी पेज $ ८५ अब्ज संपत्तीस अब्ज संपत्तीसह यादीत नवव्या क्रमांकावर आहेत. टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीत फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स (८३.९ अब्ज डॉलर) एकूण संपत्तीसह दहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. त्याच वेळी, भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे ८३.१ अब्ज डॉलर्ससह जगातील ११ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

हे ही वाचा:

बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ची हवा! परंतु ‘गांधी गोडसे एक युद्ध’ जोरदार आपटला

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही, संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss