Binance ने केली मोठी घोषणा, आता Apple Pay आणि Google Pay वापरून वापरकर्ते करू शकतात क्रिप्टोची खरेदी

त्यामुळे Binance ने त्याच्या पेमेंट पर्यायांमध्ये आता Apple Pay आणि Google Pay यांचा समावेश केला आहे, ज्यामुळे वापरकर्ते सहजपणे क्रिप्टो खरेदी करू शकतात.

Binance ने केली मोठी घोषणा, आता Apple Pay आणि Google Pay वापरून वापरकर्ते करू शकतात क्रिप्टोची खरेदी

आत्तापर्यंत, जर तुम्ही क्रिप्टो खरेदी करण्यासाठी Binance वापरत असाल तर तुमच्याकडे ट्रेडिंगसाठी अगदी थोडेच पर्याय उपलब्ध असतील. एक म्हणजे USDT खरेदी करण्यासाठी आणि नंतर तुमचा व्यापार पूर्ण करण्यासाठी P2P ट्रेडिंग वापरणे. जो कदाचित सर्वात लोकप्रिय आहे आणि दुसरा पर्याय म्हणजे, थेट क्रिप्टो खरेदी करण्यासाठी कार्डचा वापर करणे, परंतु कार्डचा वापर करताना वापरकर्त्याकडून खूप कमिशन आकारले जाते. तसेच सुरुवातीच्या काळात नव्या वापरकर्त्यांसाठी क्रिप्टो खरेदीसाठी Binance वापरणे जरा कठीण ठरू शकते.

त्यामुळे Binance ने त्याच्या पेमेंट पर्यायांमध्ये आता Apple Pay आणि Google Pay यांचा समावेश केला आहे, ज्यामुळे वापरकर्ते सहजपणे क्रिप्टो खरेदी करू शकतात. असा अंदाज आहे की Apple Pay आणि Google Pay या दोन्ही प्लॅटफॉर्म्सचे मिळून जवळपास ७० दशलक्ष वापरकर्ते आहेत, त्यापैकी जवळजवळ २/३ वापरकर्ते Apple Pay वापरतात. तसेच Apple Pay आणि Google Pay शी Binance ने हातमिळवणी त्याला नवीन वापरकर्ते जोडणं देखील सोपं जाणार आहे.

Binance चे जगभरात लाखो वापरकर्ते आहेत हे लक्षात घेता, ते प्लॅटफॉर्म आणि सर्वसाधारणपणे क्रिप्टोसाठी फायदेशीर आहे. आताही, बहुसंख्य लोकसंख्येसाठी क्रिप्टोकरन्सी खरेदी करणे एक कठीण काम आहे पण Binance च्या या पाऊलामुळे लोकांच्या विचारसरणीत थोडा बदल होऊ शकतो. तसेच या हालचालीमुळे बिटकॉइन स्वीकारण्यासही चालना मिळेल. पण, एक लक्षात ठेवा की Apple Pay आणि Google Pay सेवा तुमच्या देशात उपलब्ध नसल्यास, हे पेमेंट पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध नसतील.

हे ही वाचा:

आता समुद्रात होणारी तेलगळती थांबण्यासाठी वापरले जातायत मानवी केस, आश्चर्य वाटलं? तर पहा हा विडिओ

Rishabh Pant Accident Video ऋषभ पंतच्या अपघातानंतरचा पहिला व्हिडीओ आला समोर, पहा अशी होती स्थिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version