Biparjoy Cyclone चा महाराष्ट्रासह अन्य ४ राज्यांना धोका, ३६ तासात वादळ होणार आणखी तीव्र!

भारतात 'बिपरजॉय' चक्रीवादळाचा (Cyclone Biparjoy) मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसून येत आहे. तसेच या वादळामुळे ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे.

Biparjoy Cyclone चा महाराष्ट्रासह अन्य ४ राज्यांना धोका, ३६ तासात वादळ होणार आणखी तीव्र!

भारतात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा (Cyclone Biparjoy) मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसून येत आहे. तसेच या वादळामुळे ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. म्हणूनच चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या ३६ तासात आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आलाआहे.

भारताच्या दिशेने बिपरजॉय चक्रीवादळ हे वेगाने पुढे येत आहे. गुजरातमध्ये या वादळाचा परिणाम दिसू लागला आहे. या वादळामुळे गुजरातमधील वलसाडमध्ये समुद्र किनाऱ्यावर जोरदार लाटा उसळत आहेत. तसेच गुजरातमधील सुरतमध्ये सुद्धा वादळाचा परिणाम दिसून येत आहे. डुमास आणि सुवलीमध्ये उंच लाटा उसळत आहेत. म्हणूनच १४ जूनपर्यंत किनारी भाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. तीव्र वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी बॅनर पोस्टर्स फाटले आहेत. खबरदारी म्हणून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच मच्छीमारांना सुद्धा समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

बिपरजॉयचा या वादळाचा प्रभाव येत्या ३६ तासांत देशातील चार राज्यांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या आसपासच्या भागात ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांमध्ये दक्षता घेण्यात येत आहे. म्हणूनच भारतीय हवामान खात्याने मच्छिमारांना केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ हे पुढील ३६ तासांत आणखी तीव्र होणार आहे. पुढील दोन दिवसांत ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल.

हे ही वाचा:

आजचे Petrol चे दर जाणून घ्या आणि विकेंड Long Trip साठी टॅंक फुल्ल करा!

घरच्या घरी बनवा कोहळ्यापासून चविष्ट शिरा; जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

का घेणार Adipurusha चित्रपटाचे १०,००० तिकीट Ranbir Kapoor? जाणून घ्या कारण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version