Blue Aadhaar Card : ब्लू आधार कार्ड म्हणजे काय ? आणि ते कसे बनवायचे …?

Blue Aadhaar Card : ब्लू आधार कार्ड म्हणजे काय ? आणि ते कसे बनवायचे …?

Aadhar card आता सर्वांसाठीच महत्वाचे झाले आहे. आधार कार्ड नसल्यामुळे लहान मुलांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहे. UIDAI ने त्यांचे ऑनलाइन पोर्टल उघडले आहे, जे व्यक्तींना आधार कार्डवर नमूद केलेली त्यांची वैयक्तिक माहिती ऑनलाइन अपडेट करण्यात मदत करते. सरकारने ५ वर्षांखालील मुलांसाठी ‘ब्लू आधार कार्ड’ लाँच केले आहे. ‘ब्लू आधार कार्ड’ला (Blue Aadhaar Card) ‘बाल आधार कार्ड’ असेही म्हणतात. तर आज आपण जाणून घेऊया ब्लू आधार कार्ड विषयी.

हे ही वाचा : आज एकाचवेळी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री बोलणार

 

UIDAI ( Unique Identification Authority of India) ने ५ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे आधार कार्ड जारी केले आहे. बायोमेट्रिक तपशील ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी वैध नाहीत. ५ वर्षापर्यंत मुलांचे बायोमेट्रिक तपशील बदलत राहत असल्याने, UIDAI या मुलांचे बायोमेट्रिक तपशील पुरावा म्हणून विचारात घेऊन आधार कार्ड जारी करत नाही.

 

ब्लू आधार कार्ड कसे बनवणे –

UIDAI च्या नियमांनुसार, ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी मुलाच्या पालकांकडे म्हणजेच पालकांपैकी एकाचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीचे आधार कार्ड मुलांच्या आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. यासाठी आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जावे लागेल. तेथे जाऊन बालकाच्या पालकाला ‘बाल आधार कार्ड’चा नोंदणी अर्ज भरावा लागेल. यानंतर, तुम्हाला नोंदणी फॉर्मसह मुलाच्या जन्म प्रमाणपत्र घेऊन जावे लागते . यासोबतच पालकांना त्यांच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी फॉर्मसोबत ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा पासपोर्टची प्रतही सादर करावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या मुलाचे आधार कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाईल.

हे ही वाचा : 

‘… आरोप खोटे ठरल्यास काय कराल, पत्राचाळ घोटाळा आरोपांवर शरद पवारांचं स्पष्टीकरण

 

Exit mobile version