spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ब्लू टिक आता फुकट मिळणार नाही; नव्या मालकाने आवळल्या Twitter च्या नाड्या

सध्या संपूर्ण जगभरात ट्विटरची (Twitter News) चर्चा आहे. आता ट्विटरची मालकी एलन मस्क (Elon Musk) यांच्याकडे गेली आहे. मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासूनच बदलांच्या नांदीचे संकेत दिले होते.

सध्या संपूर्ण जगभरात ट्विटरची (Twitter News) चर्चा आहे. आता ट्विटरची मालकी एलन मस्क (Elon Musk) यांच्याकडे गेली आहे. मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासूनच बदलांच्या नांदीचे संकेत दिले होते. त्यानुसार, लवकरच ट्विटरमध्ये अनेक बदल घडणार आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, ट्विटर युजर व्हेरिफिकेशन प्रक्रियेत बदल होणार आहे. एलन मस्क (Elon Musk) यांनी रविवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “संपूर्ण व्हेरिफिकेशन प्रक्रिया सध्या सुधारित केली जात आहे.” मात्र, या संदर्भात त्यांनी अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही.

 Twitter Blue गेल्या वर्षी जूनमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. ट्विटर ब्लू युजर्सना विशेष मासिक सदस्यत्व तसेच त्यांचं ट्वीट एडिट करण्याचंही फिचर मिळतं. दरम्यान, एलन मस्क यांनी एप्रिलमध्ये एक पोल घेतला होता. या पोलमार्फत ट्वीट एडिट करण्याचं फिचर मिळालं पाहिजे की, नाही? यासंदर्भात त्यांनी युजर्सचं मत जाणून घेतलं पाहिजे होतं. या पोलमध्ये तब्बल ७० टक्के लोकांनी ट्वीट एडिट फिचर मिळणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला काही युजर्सना ट्वीट एडिट करण्याचं फिचर देण्यात आलं आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ट्विटर युजर्सचं (Platformer) खातं व्हेरिफाइड करण्यासाठी आणि ब्लू टिक देण्यासाठी शुल्क आकारण्याचा विचार करत आहे. अहवालानुसार, ट्विटर वापरकर्त्यांना ब्लू टिक टिकवून ठेवण्यासाठी म्हणजेच, त्यांचं अकाउंट व्हेरिफाईड करण्यासाठी ४.९९ डॉलर्स म्हणजेच, सुमारे ४१५ रुपये प्रति महिना भरावे लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या चीफ ट्वीट (Chief Twit) एलन मस्क यांनी यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कदाचित मस्क व्हेरिफाईड अकाउंट्ससाठी कोणतंही शुल्क न आकारण्याचाही निर्णय घेऊ शकतात. द व्हर्जच्या रिपोर्टनुसार, ट्विटर ब्लूसाठी सबस्क्रिप्शन शुल्क वाढवू शकतं. यामार्फतच युजर व्हेरिफिकेशन केलं जाऊ शकतं. द वर्जनं अंतर्गत पत्रव्यवहारामार्फत सांगितलं की, शुल्क ४.९९ डॉलर्स ते १९.९९ डॉलर्स प्रति महिना असू शकतं.

हे ही वाचा :

Maharashtra Politics : ‘मी दिलेले शब्द मागे घेतो…’ ; शिंदेंच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू-रवी राणा यांच्यातील वाद मिटला

हर हर महादेव सिनेमावर अमोल मिटकरी बरसले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss