कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले .. ?

मागील अनेक महिन्यांपासून भारतीय कुस्तीपटूंचं आंदोलन हे चालू होत. संसद भवनाच्या उद्टघाटनाच्या दिवशीही या कुस्तीपटूंनी संसद भवनासमोर आंदोलन करायचे नियोजित केले होते.

कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले .. ?

मागील अनेक महिन्यांपासून भारतीय कुस्तीपटूंचं आंदोलन हे चालू होत. संसद भवनाच्या उद्टघाटनाच्या दिवशीही या कुस्तीपटूंनी संसद भवनासमोर आंदोलन करायचे नियोजित केले होते. पण त्यांना असे न करू देता पोलिसांनी त्यावेळी त्यांना संसद भवनाच्या काही दूर असतानाच उचलले व त्यांच्यावर लाठीचार्ज देखील त्यावेळी करण्यात आला होता. तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान या सर्व घटनेकडे दुर्लक्ष करून संसद भवनाच्या उद्घाटनात व्यस्थ होते. गेल्या पाच महिन्यांपासून चालू असलेले हे आंदोलन भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात सुरू होते पण आता हे आंदोलन अखेर मागे घेतले आहे. कुस्तीपटू (wrestler) साक्षी मलिक हिने ट्वीट (tweet) करत याबाबत माहिती दिली आहे. यावर आता कुस्तीगीर महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ब्रिजभूषण सिंह म्हणाले,हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे याबाबत आता मला कोणतीही टिप्पणी (Comment) करायची नाही. न्यायालय या प्रकरणी योग्य ते काम करेल”, एवढीच प्रतिक्रिया ब्रिजभूषण सिंह यांनी दिली. न्यूज २४ ने घेतलेल्या मुलाखतीत ते त्यांनी सांगितले होते. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी हे कुस्तीपटू (wrestlers) गेल्या पाच महिन्यांपासून करत होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहचले असून सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयात चार्जशीटदेखील (chargesheet) दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान आता कुस्ती महासंघाच्या निवडणुकांना सुरुवात झाली आहे. कुस्तीसंघाची ही निवडणूक ११ जुलैला होऊ शकते. सरकाराने दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीची आम्ही वाट पाहू,” असे ट्विट साक्षी मलिकने केले आहे. तिने या ट्विटमध्ये असेही म्हटले की “कुस्तीपटूंची ७ जूनला सरकारबरोबर बैठक झाली. या बैठकीत सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लैंगिक शोषण (sexually abuse) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी तपास पूर्ण करत १५ जूनला चार्जशीट (chargesheet) दाखल केली आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत कुस्तीपटूंची ही रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात सुरु राहणार.”

हे ही वाचा:

घरच्या घरी वापरली जाणारी मोहरी ठरते Bad Cholesterol वरील रामबाण उपाय

शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’ चित्रपट थिएटरमध्ये नाही दाखवणार ; निर्मात्यांनी कारण सांगितले ….

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, सिद्धरामय्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version