spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

BBC च्या दिल्ली कार्यालयावरील आयकर विभागाच्या धाडीवर ब्रिटन सरकारने दिली प्रतिक्रिया

आज बीबीसी (BBC) या वृत्तसंस्थेच्या दिल्ली आणि मुंबईच्या कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बीबीसीने एक डॉक्युमेंट्री प्रदर्शित केली होती. या डॉक्युमेंट्रीचे नाव “इंडिया- द मोदी क्वेश्चन” होते. या डॉक्युमेंट्रीची चांगलीच चर्चा भारतातच नव्हे तर जगभरात सुरु आहे. या माहितीपटातून गुजरात दंगली दरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याच कारणामुळे भारतात बीबीसीच्या या डॉक्युमेंट्रीवर बंदी आणण्यात आली होती . असे असतानाच आता बीबीसीच्या (BBC) दिल्लीमधील कार्यालया सह मुंबईच्या देखील कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यामुळे देशभरात यावर राज्यातील अनेक बड्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. पण त्याच बरोबर आता युकेच्या सरकारने प्रतिक्रिया दिली आहे.

बीबीसी ही जगातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे. त्याच बरोबर ही संस्था ब्रिटनमध्ये स्थित आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन असे या संस्थेचे नाव आहे. अलीकडेच बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या डॉक्युमेंट्रीवरून भारतामध्ये बीबीसी वृत्तसंस्थेचा विरोध करण्यात आला त्याच बरोबर बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या डॉक्युमेंट्रीला भारतामध्ये प्रदर्शित करण्यास केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता बीबीसीच्या कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहेत. यावर भारतातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत पण आता या प्रकरणावर ब्रिटनच्या सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे. नुकताच एएनआयने त्यांच्या अहवालात करत लिहिले आहे की “आम्ही भारतातील बीबीसीच्या कार्यालयात केलेल्या कर सर्वेक्षणाच्या अहवालांचे बारकाईने निरीक्षण करत आहोत, असं युकेच्या सरकारी सुत्रांनी म्हटलं आहे”. असे एएनआयने अहवालात लिहिले आहे.

असे सांगण्यात येत आहे की आयकर विभागाने कर चुकवेगिरीच्या संशयातून बीबीसीच्या दिल्ली येथील कार्यालयावर छापा टाकला आहे. विभागाची मोठी टीम घटनास्थळी दाखल झाली असून कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे फोन देखील जप्त करण्यात आले आहेत. तर यावर बीबीसी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

पुण्यात निवडणुकीदरम्यान पाळला जाणार ड्राय डे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निर्णय

ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून श्री महावीर जैन हॉस्पिटलचा करण्यात आला गौरव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss