भावा बहिणीने केलं लग्न, पुढे घडला विचित्र प्रकार

भाऊ बहीण म्हटलं की मजा, मस्ती, भांडणं हे सर्व आठवायला लागते. तर मोठा भाऊ देखील बहिणीची तितकीच जबाबदारीने काळजी घेताना दिसतो. मात्र काही ठिकाणी भावा बहिणीचं नातं असताना देखील घरच्यांच्या नकळत एकमेकांशी लग्न केलं जातं.

भावा बहिणीने केलं लग्न, पुढे घडला विचित्र प्रकार

भाऊ बहीण म्हटलं की मजा, मस्ती, भांडणं हे सर्व आठवायला लागते. तर मोठा भाऊ देखील बहिणीची तितकीच जबाबदारीने काळजी घेताना दिसतो. मात्र काही ठिकाणी भावा बहिणीचं नातं असताना देखील घरच्यांच्या नकळत एकमेकांशी लग्न केलं जातं. आता पर्यंत असे प्रकार खूप ऐकायला मिळाले आहेत. पण बहीण-भावाने एकमेकांशी लग्न करण्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात, याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका बहीण-भावाने लग्न करून एका बाळाला जन्म दिला पण त्यांच्या या नात्याचा परिणाम त्या बाळाला भोगावा लागला. ही घटना उज्बेकिस्तानच्या (Uzbekistan) डस्टलिकमध्ये एका बाळाच्या जन्मानंतर खळबळ उडाली आहे.

त्याच्या अवस्थेचं कारण त्याचे आईवडील. कारण ते दोघंही नात्याने सख्खे भाऊ-बहीण आहेत. उज्बेकिस्तानाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 4 जूनला या बाळाचा जन्म झाला. 35 आठवडे 4 दिवसांनी बाळ जन्माला आलं. त्याची उंची 47 मीटर होती. वजनही खूप कमी होतं. त्याची अवस्था खूप वाईट होती. पूर्ण शरीरावरील त्वचा सापासारखी होती. डॉक्टरांच्या मते, त्याला Lchthyosis Congenita हा आजार होता. ज्यामध्ये त्वचा लाल, कोरडी आणि खरखरीत होते. त्वचेवरून माशांसारखे खवले निघतात. तसंच त्याला बरेच जीवघेणे आजारही होते.

डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण जन्माच्या 2 तास 10 मिनिटांनीच त्याचा मृत्यू झाला. गुंतागुंतीमुळे मूल जगू शकलं नाही. या घटनेचं फुटेज उज्बेकिस्तानच्या एका रुग्णालयातून बाहेर आलं. ज्यामध्ये नर्स बाळाला स्वच्छ करताना दिसत आहे. बाळाची अवस्था पाहून कुणाचाही थरकाप उडेल. बाळाच्या अशा परिस्थितीला त्याचे आई वडील जबाबदार ठरले. बाळाचे पालक खरंतर भाऊ-बहीण होते. महिलेचं हे दुसरं मूल होतं. महिलेला आधीच्या नवऱ्याकडून एक मूल होतं. दुसऱ्या मुलाचे वडिल तिचाच भाऊ होता. हिंदू धर्मात लग्नाबाबत काही नियम आहेत. त्यापैकी एक म्हणजे एकाच गोत्रात लग्न न करणं. खरंतर याला वैज्ञानिक आधारही आहे. एकाच जीन्समध्ये लग्न केल्याने त्याचे परिणाम त्यांच्या मुलांना भोगावे लागतात. हे या प्रकरणातून समोर आलं आहे.

Exit mobile version